मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी बौद्ध, जैन, लिंगायत व शीख धर्माबद्दल वक्तव्य केले आहेत. हे सगळे हिंदू आहेत, त्या हिंदू धर्माच्याच पोटशाखा असल्याचं पोंक्षे म्हणाले आहे. ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी हे धर्म वेगळे नसून सगळे राम, कृष्ण व भगवद्गीताच मानत असल्याचं म्हटलं आहे.
भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…”
शरद पोंक्षे म्हणाले, “बौद्ध, जैन, लिंगायत सगळे हिंदूच आहेत, त्या आमच्याच शाखा आहेत, फक्त त्यांच्या उपचार पद्धती वेगळ्या आहेत. गौतम बुद्ध दुसऱ्या राष्ट्रातून आले नव्हते, ते आमच्याच मातीला जन्माला आले होते. त्यांना आमचाच एक अवतार म्हणतात. त्यांनी फक्त कर्मकांडांची पद्धत वेगळी करून टाकली. बौद्ध धर्म, जैन आपल्यापासून वेगळे होऊ लागले आहेत. शीख वेगळा धर्म आहे म्हणे, कुठला वेगळा धर्म आहे? या सगळ्या मूळ हिंदू धर्माच्या पोटशाखा आहेत.”
मुंबई व उपनगरांचं उदाहरण देत शरद पोंक्षे म्हणाले, “जसं आधी मुंबई कुलाबा ते वांद्र्यापर्यंत होती, मग वाढत वाढत उपनगरं झाली. तसंच मूळ हिंदू धर्माची उपनगरं आपण या धर्मांना म्हणू शकतो. काही उपचार पद्धती त्यांनी वेगळ्या बनवल्या. ते वेगळ्या कुठल्या अल्लाहची प्रार्थना नाही करत, येशूची नाही करत. जैन, बौद्ध, लिंग वा शीख कोणीही वेगळ्या देवाची पार्थना करत नाहीत. सगळे राम आणि कृष्णालाच मानतात, भगवद्गीताच मानतात. आता हे सगळं पसरवलं पाहिजे. त्यामुळेच लोकप्रियतेचा वापर करून व्याख्यानं सुरू केली,” असं त्यांनी सांगितलं.