प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये दमदार अभिनय करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते त्यांच्या अभिनयाबरोबरच देशाचा इतिहास, राजकीय परिस्थिती, सामाजिक घडामोडी याविषयी आपली परखड मतं मांडत असतात. राज्यातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जुना व्हिडीओ शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. शरद पोंक्षेंनी शेअर केलेला व्हिडीओ नेमका काय आहे जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “कुठेतरी थांबायला हवं”, ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर केदार शिंदेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय; म्हणाले…

मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर जालन्यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडल्यावर आता राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा मूळ व्हिडीओ आमदार सत्यजीत तांबे यांनी शेअर केला होता. यामध्ये विलासराव देशमुख यांनी आरक्षणाच्या संदर्भात वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा : ‘जवान’ची ग्रँड ओपनिंग! शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोडला ‘पठाण’चा रेकॉर्ड, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणाले होते, “जेव्हा जातीनिहाय आरक्षण देण्याचा प्रश्न येतो तेव्हा हा संघर्ष भविष्यामध्येही राहणारच…आणि म्हणूनच आर्थिक निकषांवर आधारित आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला, तर लोक स्वत:ची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आज प्रत्येकजण माझी जात कोणती आणि मला सवलत कशी मिळेल या शोधात आहे. आरक्षणाच्या संदर्भात होणारा संघर्ष टाळायचा असेल, तर भविष्यात आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा विचार झाला पाहिजे. हा विचार फक्त एका राजकीय पक्षाला करून चालणार नाही. यासाठी सगळ्या राष्ट्रीय पक्षांनी एकत्र विचार करणं गरजेचं आहे. तरच आरक्षणासंदर्भातील संघर्ष टाळता येईल.”

हेही वाचा : टक्कल केलेला लूक, हुबेहुब डान्स अन्…; शाहरुख खानच्या ‘जवान’ची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला भूरळ, व्हिडीओ व्हायरल

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या या जुन्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत शरद पोंक्षे यांनी, “आज विलासरावांचं भाषण ऐकण्यासारखं आहे.” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकारणी मंडळी, सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींसह मराठी मनोरंजनसृष्टीतील काही कलाकारांनी सुद्धा या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad ponkshe share video of congress leader vilasrao deshmukh speech on reservation sva 00
Show comments