बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा गेल्या काही दिवसांपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी दिलेला स्वातंत्र्य लढा व त्यांचं संपूर्ण जीवनकार्य या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. सध्या देशभरातील विविध मान्यवर या चित्रपटाविषयी आपलं मत मांडत आहेत.

दोन दिवसांपूर्वी मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षेंनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सर्वांनी पाहावा याकरता एक फेसबुर पोस्ट शेअर केली होती. आता नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये पोंक्षे यांनी चित्रपट पाहिल्यावर काय वाटलं याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : मालिकेचा सेट म्हणजे माझं घर! ‘आई कुठे काय करते’ फेम संजनाचं अनोखं होळी सेलिब्रेशन, म्हणाली, “माझ्या आईने…”

“आज ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा पाहिला. ८३ वर्षांचं आयुष्य ३ तासात दाखवायचं अत्यंत अवघड पण हुड्डांनी ते छान दाखवलंय. विशेषतः अंदमान पर्व त्यात केलेले दयेचे अर्ज या सर्व गोष्टी पाहणाऱ्याला नीट लक्षात येतील व गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. हुड्डा यांचे अभिनंदन.” अशी पोस्ट शेअर करत शरद पोंक्षेनी चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा : Video : “माझं नाव करिश्मा नाही…”, लोलोचा खुलासा ऐकून सगळेच झालं थक्क, अभिनेत्रीच्या नावाचा उच्चार नेमका आहे तरी काय?

दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात रणदीप हुड्डासह अभिनेत्री अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाने प्रचंड मेहनत घेत तब्बल ३० किलो वजन कमी केलं होतं. याशिवाय चित्रपटासाठी घर विकल्याचं त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.

Story img Loader