अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाटक, चित्रपट, मालिका हा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं वेगळी छाप उमटवली आहे. आपल्या अभिनयाबरोबरच त्यांचे परखड विचार हे नेहमी चर्चेचा विषय असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व याविषयी शरद पोंक्षे व्याख्यानं देत असतात. सध्या त्यांच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे; ज्यामध्ये अभिनेते वंदे मातरम दुर्दैवाने राष्ट्रीय गीत झालं, असं म्हणताना दिसत आहेत.
हेही वाचा – Video: भाजलेल्या जखमेसह सारा अली खानने केला रॅम्प वॉक, व्हिडीओ होतोय व्हायरल
अभिनेते शरद पोंक्षे यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे; ज्याला कॅप्शन “वंदे मातरम,” असं लिहिलं आहे. या व्हिडीओत शरद पोंक्षे म्हणतायत की, वंदे मातरम आणि जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत. पण दुर्दैवाने जे आपलं राष्ट्रगीत व्हायला हवं होतं, ज्याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळायला हवा होता, ते आज दुर्दैवाने राष्ट्रीय गीत झालं आहे. केवळ कोणी ना कोणीतरी मी जे परवाच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला हिंदी राष्ट्रवाद सांगितला, जो काँग्रेसने स्वीकारला. मुळात ब्रिटिशांनी राष्ट्रीय काँग्रेसची उभारणीच हिंदी राष्ट्रवादावर केली. जेणेकरून कधीही राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण स्वातंत्र्याची मागणीच करू शकणार नाही. हा हिंदी राष्ट्रवाद हा हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक मानला गेला आणि त्याच्या पुढे जाऊन जे परिणाम भारताला भोगावे लागले. त्यातला सगळ्यात पहिला परिणाम कोणाला भोगावा लागला असेल तर तो वंदे मातरम या बंकिमचंद्र चटर्जी यांच्या गीताला.
दरम्यान, शरद पोंक्षेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते नुकतेच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांच्यासह श्रेयस तळपदे, गौरी इंगवळे, सुहास जोशी असे अनेक कलाकार पाहायला मिळाले. १ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.