ज्येष्ठ मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. सोशल मीडियावर खूप घाणेरड्या पातळीवर टीका केली जाते, असं ते म्हणाले आहेत. भाग्यश्री चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची मुलगी परदेशात शिकायला गेल्यानंतर झालेल्या टीकेलाही उत्तर दिलं. तसेच एखाद्याची मतं पटत नसेल तर चर्चा करायची नाही, असंही त्यांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रोलिंगबद्दल शरद पोंक्षे म्हणाले, “फालतूतला फालतू माणूस, ज्याची लायकी नाही, ज्याने दोन ओळी कधी आयुष्यात वाचल्या नाहीत तो उठतो आणि ट्रोल करतो. त्याला काही निती-नियम नाही, त्याला काही संहिता नाही, त्याला कुठले कायदे-कानून नाही. खोट्या नावांनी अकाउंट्स उघडतात, भन्नाटच काहीतरी नावाने अकाउंट्स असतात. कोणीही कोणाला शिव्या देतं आपण बघायला गेलो तर प्रोफाईल लॉक असते. सगळं इतकं गलिच्छ आहे, कुठे चाललोय आपण? मला एखाद्याची मतं नाही पटत तर ठिक आहे. आपल्याला जन्मदात्या आई-वडिलांचं पटत नाही. नवरा बायकोची मतं पटत नाही, मग ती चर्चेत नाही घ्यायची, सोडून द्यायची.”

Video: “…हे समजायची कुवत नाही समोरच्यांची”, शरद पोंक्षे यांचे वक्तव्य चर्चेत

पुढे ते म्हणाले, “मी नथुराम गोडसेचा रोल केल्यामुळे या २० वर्षांत इतक्या घाणेरड्या पद्धतीने मला ट्रोल केलं गेलं. इतकं घाण-घाण बोललं गेलं. मीही सामान्य माणूसच आहे, त्यामुळे सुरुवातीला त्रास व्हायचा. पण नंतर मी ते ओव्हरकम करायला शिकलो. मग विचार करू लागलो की ट्रोल करणाऱ्याची बुद्धीमत्ताच तेवढी आहे, त्याला माहीत नाही शरद पोंक्षे तर तो काय करणार.”

“आपल्या घरात कितीही कचरा असला तरी…”, किरण मानेंची शरद पोंक्षेंच्या मुलीसाठी पोस्ट, म्हणाले “तू त्यांना खोटं हसत…”

ट्रोलिंबद्दल बोलताना त्यांनी त्यांची मुलगी परदेशात शिकायला गेल्यानंतर झालेल्या टीकेला उत्तर दिलं. “आत्ताचं उदारहरण घ्या. वर्षभरापूर्वी माझी मुलगी पायलट व्हायला अमेरिकेला गेली. विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी माझ्या व्याख्यानामधले काही रील्स मी सातत्याने सोशल मीडियावर टाकत असतो. त्याखाली कमेंट्स असायच्या. हा बघ, बहुजनांच्या पोरांची माथी भडकवतोय आणि स्वतःच्या पोरीला मात्र अमेरिकेत पायलट व्हायला पाठवलं. आता हे बोलताना त्यांना हे माहीत नाही की गांधीजी, आंबेडकर, सावरकरदेखील परदेशातच शिकायला गेले होते. सगळी माणसं परदेशातच शिकायला गेली होती. परदेशात शिकायला जाणं काही पाप नाही. चांगलं शिक्षण हवं असेल आणि जर ते आपल्याकडे नसेल तर जाईल ना माणूस. त्यात काय प्रॉब्लेम आहे. आता तर सगळं ग्लोबल झालंय, जग जवळ आलंय.”

“मानसिक धक्क्यातून सावरण्याची…”, अभिनेत्री मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत

पुढे ते म्हणाले, “पोस्ट कुठली आहे, काय लिहिलं आहे, कशावर काय बोलतो आपण, कशाचा काहीच संबंध नसतो. मग ही गाढवं आहेत असा मी विचार करतो आणि मला त्यांच्याबाबतीत वाईट वाटतं. मला डबक्यातल्या बेडकाची गोष्ट आठवते, त्याला वाटतं की हाच समुद्र आहे. अशी त्यांची अवस्था आहे. ते ज्या नेत्यांच्या मागे धावतात, तेही त्यांना तसंच भडकवतात. सगळं फार गलिच्छ होऊन बसलंय म्हणून आपल्याकडची लोकशाही अपयशी आहे,” असं शरद पोंक्षे म्हणाले.