सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांचा जीवनपट लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. सुधीर फडके यांच्या १०५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चरित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. या चित्रपटात अभिनेते सुनील बर्वे बाबुजींच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची भूमिका साकारणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “फालतू माणूस, ज्याची लायकी नाही…”, शरद पोंक्षेंनी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “मी नथुराम गोडसेचा…”

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या शूटिंगल्या येत्या काही दिवसांत सुरूवात होणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार काम करणार आहेत. याविषयी ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पोंक्षे म्हणाले, “बाबूजी फक्त चित्रपट क्षेत्राशी संबंधित नव्हते. संगीतकार, गीतकार आणि उत्तम गायक असण्याबरोबरच त्यांनी सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली होती. हिंदूराष्ट्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक स्वयंसेवक, सावरकरप्रेमी असं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्यवीर सावकर आणि डॉ. हेडगेवार ही दोन व्यक्तिमत्त्व आली आणि त्यानंतर बाबूजींचं आयुष्य बदललं. डॉ. हेडगेवारांसारख्या एका महान माणसांची भूमिका करायला मिळणं हे मी भाग्य समजतो.”

हेही वाचा – “स्वतःच्या मुलीला परदेशात पाठवून हा बहुजनांच्या मुलांची माथी भडकवतोय” या टीकेवर शरद पोंक्षे म्हणाले, “ही गाढवं…”

डॉ. हेडगेवार यांची वेशभूषा करून स्वत:ला पहिल्यांदा आरशात पाहिल्यावर मनात काय भावना होत्या याविषयी सांगताना शरद पोंक्षे म्हणाले, “डॉ. हेडगेवार यांची वेशभूषा केल्यावर मला थरकाप उडाल्यासारखं झालं…माझ्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांची वेशभूषा करून जेव्हा मी पहिल्यांदा रंगमंचावर आलो तेव्हा अक्षरश: माझ्या डोळ्यात पाणी आलं. या सगळ्या महापुरुषांमध्ये खरंच जादू आहे. यापूर्वी एका नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना माझं असं झालं होतं. या महापुरुषांचा पोशाख केल्यावर अशी भावना येत असेल तर प्रत्यक्षात हे लोक काय असतील… खरंच ते अद्भूत होते.”

हेही वाचा – Video: “…हे समजायची कुवत नाही समोरच्यांची”, शरद पोंक्षे यांचे वक्तव्य चर्चेत

“बाबूजींशी भेट झाल्यावर डॉ. हेडगेवार यांनी त्यांना काय सांगितलं हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. तसेच चित्रपटात तुम्हाला अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतील” असं शरद पोक्षेंनी सांगितलं. दरम्यान, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’हा बहुचर्चित चित्रपट डिसेंबर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad ponkshe to play dr k b hedgewar role in swargandharva sudhir phadke marathi movie sva 00
Show comments