Shashank Shende : मंगला कपूर यांच्या आयुष्यावर आधारित ‘मंगला’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने शिवाली परब, अलका कुबल, शशांक शेंडे आणि दिग्दर्शिका अपर्णा होशींग यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला उपस्थिती लावली होती. यावेळी शशांक शेंडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबत आपली स्पष्ट मतं मांडली. ते नेमकं काय म्हणाले, सविस्तर जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठी चित्रपटसृष्टीची सद्यस्थिती, मराठी सिनेमांना स्क्रीन्स न मिळणं यावर शशांक शेडेंनी आपलं मत मांडलं आहे. अभिनेते म्हणाले, “याचं उत्तर खरंतर खूपच विस्तृत आहे कारण, मराठी चित्रपटांची तुलना साऊथबरोबर केली जाते. साऊथ चित्रपट चालतात, आमचे चालत नाहीत. पण, साऊथमध्ये हिंदी चित्रपट रिलीज केले जात नाहीत. आमची स्पर्धा ही थेट बॉलीवूडशी आहे. आता ‘मंगला’बरोबर जर ‘धूम ४’ प्रदर्शित झाला तर, तुम्ही मंगला चित्रपट पाहायला जाल का? त्यामुळे आपल्या सिनेमांना जाणं ही प्रेक्षकांशी नैतिक जबाबदारी आहे. त्यात आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवलेला आहे. मग, आपण आपल्या चित्रपटांना का जात नाही. मराठी चित्रपट फक्त आपल्या प्रेक्षकांना आवडत नाहीत. बाकी, जगात सगळीकडे मराठी चित्रपट पाहिले जातात. आपल्या चित्रपटांची अनेक उदाहरणं दिली जातात.”

हेही वाचा : आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…

शशांक शेंडे पुढे म्हणाले, “मी जेव्हा नव्या मराठी चित्रपटांचे ट्रेलर पाहतो, तेव्हा त्यात ट्रोलिंग करणाऱ्या जमाती आढळतात. ५०-७० जण भिकार चित्रपट बनवलाय वगैरे अशा कमेंट्स करतात. अरे पण, आधी येऊन बघा… आधीच नकारात्मक कमेंट्स का करतात. बरं हे फक्त चित्रपटापुरतं मर्यादीत नाहीये. ओटीटीवर सुद्धा हीच परिस्थिती आहे. मराठी चित्रपटांना ओटीटीवर स्थान नाही. इथून पुढे, सॅटेलाईट सुद्धा मराठी चित्रपट घेणार नाही. मी निगेटिव्ह बोलतोय असं वाटेल पण, खरंच सांगतो मराठी चित्रपटसृष्टी आता ऑक्सिजनवर आहे. तो अनुदानाचा मास्क काढून घेतला, तर हे कुठे जातील हे कोणालाही कळणार नाही.”

“मी जेव्हा हैदराबादमधल्या मित्रांशी बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की, ६०० रुपयांत चार माणसं व्यवस्थित चित्रपट पाहतात. पण, मुंबईत असं नाहीये. मुंबईत २३० रुपयांचं तिकीट, १८० रुपये पॉपकॉन एका माणसाला ६०० ते ७०० रुपये खर्च होतात. तर, संपूर्ण कुटुंब चित्रपट पाहायला गेलं तर ३ हजार रुपये खर्च होतात. यामागे अनेक गोष्टी आहेत…हा प्रश्न लगेच सुटणारा नाहीये. या गेल्या वर्षभरात एकही मराठी चित्रपट चाललेला नाही…आणि ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. तरी सुद्धा दिग्दर्शक-निर्माते मराठीच्या प्रेमापोटी नेटाने चित्रपट करत आहेत…की, ही आपली भाषा आहे आणि ही भाषा जगलीच पाहिजे.” असं स्पष्ट मत अभिनेत्याने मांडलं आहे.

हेही वाचा : Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ

दरम्यान, अभिनेते शशांक शेंडे यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी आजवर ‘रेडू’, ‘बापल्योक’, ‘ख्वाडा’ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ‘मंगला’ चित्रपटात ते शिवालीच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहेत.