‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केले आहे. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला या चित्रपटाची आता भुरळ पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद, गाणी, सर्व कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांना खूप आवडले आहे. सोशल मीडियावर हा चित्रपट आवडल्याचे सांगत या चित्रपटाच्या टीमचे नेटकरी भरभरून कौतुक करीत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. तर या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवली. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेदेखील या गाण्यावर ताल धरीत रील बनवले आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ने IMDB साईटवर सलमान खानच्या चित्रपटाला टाकलं मागे, मिळवले ‘इतके’ रेटिंग्ज

शिल्पा शेट्टी हिने नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्याची हूक स्टेप करीत थिरकताना दिसत आहे. अत्यंत आनंद घेत तिने या गाण्यावर नृत्य केले. हा व्हिडीओ पोस्ट करीत तिने लिहिले, “बहरला हा मधुमास नवा.” तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ला मिळणारा प्रतिसाद पाहून केदार शिंदेंनी प्रेक्षकांना दिली ‘ही’ खास भेट

तिने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तिने केलेला नाच सर्वांना आवडला आहे. तर तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत नेटकरी तिचे कौतुक करीत आहेत.