लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाहीचा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चाहता वर्ग आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आज शिंदे घराण्याची चौथी पिढी जिवंत ठेवून आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत उल्लेखनीय आणि वाखण्याजोग असं योगदान शिंदेशाहीचं आहे. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदेशाहीनं उद्योग जगतात पदार्पण केलं आहे. यासंदर्भात गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अनघा अतुलने २०२०मध्ये सुरू केलं होतं पहिलं हॉटेल; ‘या’ कारणामुळे वर्षभरातच करावं लागलं बंद

उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. नेहमी कोणत्या ना कोणत्या कलाकाराविषयी किंवा विविध विषयावर पोस्ट करत असतो. आज उत्कर्षने काही फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शिंदे कुटुंबीयांनी आता उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. स्वतः पहिलं पेट्रोल पंप शिंदे कुटुंबीयांनी पंढरपूर येथे सुरू केलं आहे.

या क्षणाचे खास फोटो शेअर करत उत्कर्षनं लिहीलं आहे, “छत्रपती शिवबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा, अण्णा भाऊ ते अन्य महात्म्यांच्या विचारांना आदर्श मानले, म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे. बाबासाहेब तुम्ही म्हणालात – शिका…आम्ही गायक, डॉक्टर इंजिनिअर झालो. तुम्ही म्हणालात संघटित व्हा, संघर्ष करा तर आम्ही एक कुटुंब राहून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पुढे सरसावलो. रस्त्यावर भजन गाणारी एक पिढी मंदिरात देवाला जागवणारी दुसरी पिढी, लोकसंगीतातून महाराष्ट्राला सण साजरे करताना नाचवणारी तिसरी पिढी ते आज चित्रपटातून सर्वांच्या गळ्याचे ताईत होणारी चौथी पिढी. न थकता न थांबता फक्त कामाला प्रेम करणारे महामानवांच्या विचारांचे पाईक होऊन “तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या ब्रीदवाक्याला सदैव मनात कोरून काम करणारे आमचे शिंदे कुटुंब. भजन, कवाली, गायन ,चित्रपट गीते, आता चित्रपटात अभिनेता ते डॉक्टर डिग्री दवाखाने ते आता उद्योग जगात पदार्पण करत शिंदे परिवाराच पहिलं पेट्रोल पंप. वेळापूर (पंढरपुर) येथे सुरू झालं. आता विषय पंपावर….”

हेही वाचा – Video: ‘टायगर ३’ चित्रपटातील शाहरुख खानचा कॅमिओ लीक; सलमान खानला वाचवण्यासाठी बादशाहची खतरनाक एन्ट्री

पुढे उत्कर्षनं लिहीलं, “छत्रपती शिवबा, महात्मा ज्योतिबा, अण्णा भाऊ ते अन्य महात्म्यांच्या विचारांना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे. रसिक मायबापाने भरभरून प्रेम दिले त्या प्रेमाची परतफेड आम्हाला कधीच करता येणार नाही. आम्ही हर्षद, आदर्श, उत्कर्ष असेच मेहनत करत राहू पण त्याला साथ हवी तुमच्या आशीर्वादाची. क्यूकी ज़िंदगी कि असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है.”

हेही वाचा – दिवाळी पार्टीसाठी जान्हवी कपूरचा खास ग्लॅमरस लूक; रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीने वेधलं लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

उत्कर्षची ही पोस्ट वाचून चाहते शिंदे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे, “खरंतर समाजप्रबोधन करून तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकांच्या लहानांच्या मनामनात कोरले. शिवाय सर्वच स्तरातून तुम्ही गायकी स्वरुपात शिंदेशाही ठसा उमटवलात. शिंदे कुटुंब आणि गाण्याशिवाय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहाट सुरू होतंच नाही. शिंदे परिवाराचे मनापासून धन्यवाद आणि आभार. नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहात यामध्ये पण तुम्हाला नक्कीच सफलता मिळेल तिळमात्रही शंका नसावी. शिंदे परिवाराचे अभिनंदन.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde family started a new petrol pump pandharpur photos shared by utkarsh shinde pps
Show comments