Shivaji Satam V Shantaram Jivangaurav Purskar : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत दिलेल्या विशेष योगदानाबद्दल दरवर्षी महाराष्ट्र राज्य शासनाकडून सिनेविश्वातील दिग्गज मंडळींचा सन्मान केला जोता. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच या मानाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
यंदा ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम ( Shivaji Satam ) यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात येईल. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी एक्स( पूर्वीचे ट्विटर ) पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
हेही वाचा : ठरलं तर मग : जुन्या रुपात अवतरली प्रतिमा! भावुक होत पूर्णा आजीने चक्क सायलीलाच बांधली राखी; नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
विजेत्या कलाकारांचं कौतुक
२०२३ चा ‘व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेते दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात येईल. याशिवाय ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ हा ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे.
“सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा” अशी एक्स पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवार यांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.
हेही वाचा : “आजोबा, प्रत्येक क्षणाला तुमची…”, विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश-जिनिलीया भावुक, शेअर केले जुने फोटो
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे.
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) August 14, 2024
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ…
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम ( Shivaji Satam ) यांनी आजवर मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘वास्तव’, ‘टॅक्सी नंबर 9211’, ‘चायना गेट’, ‘सूर्यवंशम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्यांची ‘CID’ ही मालिका विशेष गाजली. पुरस्कार जाहीर होताच विजेत्या मान्यवरांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.