Shivani Surve And Ajinkya Nanaware Engagement: अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. सोशल मीडियावरील पोस्टवरून दोघं यंदा २०२४मध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण दोघांनी याबाबत कधीच स्वतः जाहीरपणे सांगितलं नाही. मात्र सगळ्यांचा अंदाज खरा ठरला आहे. शिवानी व अजिंक्यने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. याचे फोटो अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

“अखेर बंधनात” असं कॅप्शन लिहित अभिनेत्री शिवानी सुर्वेने साखरपुड्याची पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिवानी व अजिंक्य हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – चोप्रा कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे, परिणीतीनंतर प्रियांकाची ‘ही’ बहीण चढणार बोहल्यावर, स्वतः खुलासा करत म्हणाली…

साखरपुड्यात शिवानीचं फिकट जांभळ्या रंगाच्या साडीत सौंदर्य खुललं होतं. वेस्टर्न लूकवर तिने हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला होता. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट आणि त्यावर टोपी घातली होती.

शिवानी व अजिंक्यने दिलेल्या साखरपुड्याच्या बातमीमुळे सगळ्यांना आता सुखद धक्का बसला आहे. शिवानीच्या पोस्टवर कलाकार मंडळींंसह चाहते दोघांना शुभेच्छा देत आहेत. स्वप्नील जोशी, अनघा अतुल, सुयश टिळक, सानिया चौधरी, ऋतुजा बागवे, पर्ण पेठे, मानसी नाईक, सुव्रत जोशी अशा अनेक कलाकार मंडळींनी शिवानी व अजिंक्यला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, शिवानी नुकतीच ‘झिम्मा २’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने साकारलेली मनाली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. आता लवकरच शिवानी ‘जिलबी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्या जोडीला स्वप्नील जोशी, प्रसाद ओक असणार आहेत. तसंच शिवानीचा होणारा नवरा अजिंक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Story img Loader