शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आज ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली आहे. ३१ जानेवारीला सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत अजिंक्य-शिवानीने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. सध्या या सेलिब्रिटी जोडप्यावर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

शिवानी – अजिंक्यच्या लग्नाला मराठी कलासृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या लग्नसोहळ्यातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये शिवानीने फिकट गुलाबी (बेबी पिंक) रंगाचा भरजरी लेहेंगा, तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. या जोडप्याने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये शिवानी-अजिंक्यने सध्याच्या ट्रेंडप्रमाणे विवाहसोहळ्यात पेस्टल रंगाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Paresh Mokashi, Prashant Damle as Hitler,
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत, परेश मोकाशी यांच्या मु. पो. बोंबिलवाडीला हिटलर सापडला
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
bipasha basu love affair
सुपरहिट सिनेमे, आघाडीच्या अभिनेत्यांशी अफेअर्स अन् शेवटी को-स्टारची तिसरी पत्नी झाली ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री
vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
Govinda wanted to marry neelam kothari
‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा, रागात सुनीताशी मोडला होता साखरपुडा अन्…
Tamil filmmaker slapped Padmapriya publicly
दिग्दर्शकाने सर्वांसमोर कानाखाली मारली अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”

हेही वाचा : ललित प्रभाकर प्रभू श्रीराम, तर रावण…; गेटवे ऑफ इंडियाला पार पडला गीतरामायणाचा कार्यक्रम! मराठी कलाकारांनी वेधलं लक्ष

शिवानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा भाऊ अजिंक्यचा कान पिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये दोघांच्या गळ्यातील आकर्षक वरमाला, वेस्टर्न लूक असला तरीही अभिनेत्रीच्या हातातील हिरवा चुडा, साधं अन् सुंदर मंगळसूत्र या सगळ्या गोष्टी लक्ष वेधून घेतात.

हेही वाचा : शिवानी सुर्वे झाली ननावरेंची सून! आधी गुपचूप साखरपुडा अन् आज लग्नाच्या बेडीत; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

शिवानीने या फोटोंना “आज दोन तारे एकत्र आले” असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर सध्या नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील तिचे मित्रमंडळी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, अजिंक्य-शिवानीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या लग्नाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. अखेर जवळपास ८-९ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर ही जोडी आज लग्नबंधनात अडकली आहे.