मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा शाही विवाहसोहळा १ फेब्रुवारीला ठाण्यात पार पडला. या दोघांच्या लग्नसोहळ्यातील बरेच फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवानीने लग्नात फिकट गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा, तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. अभिनेत्याने पांढऱ्या शेरवानीवर गुलाबी रंगाचा फेटा बांधला होता. लग्नमंडपात अजिंक्यने घोड्यावरून एन्ट्री घेतली होती. याशिवाय या सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नसोहळ्यात पेस्टल रंगाच्या थीमने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

हेही वाचा : सई-सिद्धार्थची रोमँटिक केमिस्ट्री, संवादांची जुगलबंदी अन्…; लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या ‘श्रीदेवी-प्रसन्न’ची अनोखी कहाणी

लग्न लागल्यावर शिवानीने अजिंक्यसाठी खास उखाणा घेतला होता. सेलिब्रिटी प्रमोटर्स या इन्स्टाग्राम पेजवर या उखाण्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात अभिनेत्री म्हणते, “एक वाती एक ज्योती, अजिंक्य माझे पती… मी त्यांची सौभाग्यवती!” सध्या शिवानीचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेही वाचा : बहिणीची काळजी घे! शिवानी सुर्वेच्या भावाने पिळला अजिंक्यचा कान, अभिनेत्रीने शेअर केले लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो

दरम्यान, शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांच्या लग्नाला मेघा धाडे, सुहास जोशी, हेमंत ढोमे, सायली संजीव, माधव देवचक्के, कुशल बद्रिके, नेहा शितोळे अशा बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आता ही जोडी लग्नबंधनात अडकून आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani surve and ajinkya nanaware wedding actress took special ukhana for husband video goes viral sva 00
Show comments