Shivani Surve and Ajinkya Nanaware Marriage : शिवानी सुर्वे – अजिंक्य ननावरे या सेलिब्रिटी जोडप्याने ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. शिवानी-अजिंक्यचा शाही विवाहसोहळा १ फेब्रुवारीला ठाण्यात पार पडला.

शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला माधव देवचक्के, नेहा शितोळे, मेघा धाडे अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. ‘झिम्मा’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट अभिनेत्रीच्या लग्नाला उपस्थित होती. लग्नसोहळ्यात या जोडप्याने पारंपरिक व रिसेप्शनला वेस्टर्न लूक केल्याचं काही व्हायरल व्हिडीओजमधून समोर आलं आहे. याशिवाय अजिंक्यने घोड्यावर बसून लग्नमंडपात एन्ट्री घेतली आहे. शिवानी-अजिंक्यवर त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Video: शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या हळदीचा व्हिडीओ आला समोर, थिरकताना दिसले ‘बिग बॉस मराठी’चे कलाकार

shivani
शिवानी सुर्वे व हेमंत ढोमे

अभिनेत्री शिवानी सुर्वे छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिका आणि ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे प्रसिद्धीझोतात आली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर हळुहळू ती चित्रपटांकडे वळली. नुकताच तिचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. खऱ्या आयुष्यात शिवानी गेली अनेक वर्षे अजिंक्य ननावरेला डेट करत आहे. या दोघांची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. २०१७ पासून शिवानी-अजिंक्य एकत्र होते. अखेर आज ही लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकली आहे.

Story img Loader