‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. या गाण्याने प्रेक्षकांसह सेलिब्रिटींनाही भुरळ घातली. या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. या गाण्यावरील अनेक रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता दाक्षिणात्य अभिनेत्रीलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं वेड लागलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका कुमारस्वामीने ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स केला आहे. राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनेही ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर ठेका धरल्याचं दिसत आहे. राधिका व श्रेयसने ‘बहरला हा मधुमास’ गाण्याच्या हुक स्टेपही केल्या आहेत.
राधिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर श्रेयस तळपदेने कमेंट केली आहे. “राधिका कुमारस्वामीबरोबर मराठी आणि कन्नड फ्युजन…”, असं श्रेयसने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> Adipurush : ‘आदिपुरुष’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या
केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. तर केदार शिंदेंची लेक सना शिंदेने या चित्रपटातून पदार्पण केलं आहे.