सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मराठी कलाविश्वात या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतंच यामधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.

‘श्रीदेवी प्रसन्न’या चित्रपटातील पहिल्या गाण्याचं नाव “दिल मैं बजी गिटार…” असं आहे. २००६ मध्ये प्रदर्शित झालेला बॉलीवूड चित्रपट ‘अपना सपना मनी मनी’ या हिंदी चित्रपटातील ‘गिटार साँग’चं हे मराठी व्हर्जन आहे. ‘अपना सपना मनी मनी’मध्ये रितेश देशमुख व श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यामुळे ‘गिटार साँग’च्या मराठी रुपांतरात देखील प्रेक्षकांना श्रेयसची झलक पाहायला मिळाली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

हेही वाचा : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलिया भट्टच्या साडीने वेधलं लक्ष! रामायणाशी आहे खास कनेक्शन, फोटो व्हायरल

श्रेयस तळपदेने मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अभिनेत्याचा ‘श्रीदेवी प्रसन्न’मधील कॅमिओ पाहून चाहते आनंदी झाले आहेत. श्रेयसने पोस्ट शेअर करत या गाण्याचा १८ वर्षांनी पुन्हा एकदा एक भाग होता आलं यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहे.

हेही वाचा : Video : “पहिल्या पायरीपासून ते २१ मजले…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेने बॉयफ्रेंडसह दाखवली नव्या घराची झलक

श्रेयसने शेअर केलेल्या पोस्टवर सिद्धार्थ-सईसह त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यातील अभिनेत्याच्या एका चाहत्याने “मराठी इंडस्ट्रीचा विजय थलपती आहेस तू श्रेयस” असं कमेंट करत म्हटलं आहे. यावर अभिनेता लिहितो, “बापरे! मित्रा…धन्यवाद, तुझे खूप आभार पण, मी श्रेयस म्हणूनच ठिक आहे रे”

हेही वाचा : Bigg Boss 17: “बिग बॉसने माझी दोन घरं उद्ध्वस्त केली…”, पत्रकार परिषदेत मुनव्वर फारुकीचं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल

shreyas talpade
श्रेयस तळपदे

दरम्यान, सई व सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये सिद्धार्थ-सईबरोबर जय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader