नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाची आधीची दोन पर्वं खूप गाजली. तर आता या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आज या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा दुसरा भाग प्रसारित होणार आहे. या भागामध्ये लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याने हजेरी लावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमात हजेरी लावून श्रेयस तळपदेने दिलखुलासपणे गप्पा मारल्या. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्याच्या व्यावसायिक आयुष्यबद्दलच्या अनेक गोष्टी त्याने सांगितल्या. तर यावेळी त्याच्याच काही जवळच्या मित्रांच्या वागण्यामुळे त्याला दुःख झालं असा खुलासा करत त्याने त्याला आलेला अनुभव शेअर केला. ‘पोश्टर गर्ल’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि काही कलाकारांवर त्याने अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा : श्रेयस तळपदेने उघड केलं त्याच्या क्रशचं नाव, म्हणाला, “आम्ही एकदाच लिफ्टमध्ये भेटलो आणि…”

श्रेयस तळपदेची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘पोश्टर बॉईज’ हा चित्रपट खूप गाजला. पण त्यानंतरच्या ‘पोस्टर गर्ल’ चित्रपटामध्ये श्रेयस दिसला नाही. तर काही वर्षांनी श्रेयसने ‘पोश्टर बॉईज’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित केला. “‘पोश्टर बॉईज’ चित्रपट तू हिंदीमध्ये तयार केल्यावर मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ते खुपलं का?” असा प्रश्न अवधूत गुप्तेने त्याला विचारला. त्यावर श्रेयस म्हणाला, “दिग्दर्शकाला वेळ नव्हता. वेगवेगळे दुसरे चित्रपट यायला लागले त्यामुळे दिग्दर्शक खूप बिझी झाला होता. तेव्हा असंही झालं होतं की, आम्ही या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलत होतो. मी त्याला म्हणालो होतो की, आपण सिक्वेलचा प्रयत्न करायचा आहे. त्यावर तो मला म्हणाला होता की, आपण भेटू. त्यावर मी त्याला म्हटलं होतं की, कधी भेटायचं? तर त्यावर तो मला म्हणाला होता की, मी सांगतो. नंतर तो बिझी होता आणि आम्ही भेटू शकलो नाही.”

पुढे श्रेयसने सांगितलं, “त्यानंतर त्याने ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटातील काही कलाकारांना घेऊन दुसरा चित्रपट दिग्दर्शित केला. तेव्हा मला धक्का बसला होता कारण चार दिवस आधी मी त्या कलाकारांना भेटलो होतो. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही चित्रपट करताय…काही मदत लागली तर सांगा. चित्रपटाचं नाव काय ठरलं? असंही मी त्यांना विचारलं होतं. त्यावर ते म्हणाले होते की, अजून काही ठरलं नाही. त्यानंतर चार दिवसांनी मला ‘पोश्टर बॉईज’च्याच फॉन्टमध्ये त्यांच्या चित्रपटाचं नाव दिसलं. जे आमच्या चित्रपटासारखंच होतं. ते पाहून मला धक्का बसला. मी असोसिएशनमध्ये फोन केला आणि त्यांना विचारलं की हे नाव कधी रजिस्टर झालं? तेव्हा मला कळलं की हे नाव सहा महिने आधीच रजिस्टर करण्यात आलं होतं. ते ऐकून मला वाईट वाटलं.”

हेही वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

“तुम्हाला एकदा यश मिळालं की त्याचं कौतुक होतं. पण ते पुन्हा पुन्हा मिळायला लागलं की ते लोकांना खुपतं. हिंदीमध्ये जर काही रोल असेल तर मी आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांचीही नावं प्रोडक्शनला सुचवायचो. पण लीड रोल असेल तरच सांगा असं उत्तर ते प्रोडक्शनला द्यायचे. माझा जो विचार असेल तोच त्या कलाकारांचा असेल असं नाही. त्यामुळे आपणच कुठेतरी दोन पावलं मागे येऊन आपलं आपलं काम करावं असं मला वाटू लागलं,” असंही तो म्हणाला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade shared a bad experience he had while working in marathi film industry rnv