अभिनेता श्रेयस तळपदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूडमध्येही त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच अभिनेत्याने शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. बाप्पाच्या दर्शनाला जाताना श्रेयसला कसा अनुभव आला याबद्दल त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा : “मला ही साडी…”, वनिता खरातचे पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट, पतीच्या कमेंटने वेधले लक्ष
श्रेयस तळपदेने नुकतंच पुण्यातील मानाच्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्यावर अभिनेत्याला वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत असलेले बापू वाघमोडे यांनी मदत केली. याविषयी श्रेयस लिहितो, “देव आपल्याला कायम गूढ मार्गाने मदत करत असतो…आज तो मला बापू वाघमोडे यांच्या रुपात भेटला.”
श्रेयस पुढे लिहितो, “दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जात असताना आम्ही वाटेत रस्ता चुकलो. तेव्हा बापू वाघमोडे आमच्याजवळ आले आणि त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही बाप्पाच्या मंडपापर्यंत बरोबर पोहोचलो आहोत की नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. धन्यवाद साहेब!”
हेही वाचा : “मुली एवढ्या लवकर का मोठ्या होतात?”, लाडक्या लेकीसाठी अक्षय कुमारची भावुक पोस्ट, म्हणाला…
“देव सतत आपल्या अवतीभवती असतो याची जाणीव या घटनेमुळे मला झाली. फक्त आपण त्याला ओळखलं पाहिजे. तो आपल्याला भेटतो, मदत करतो, मार्गदर्शन करतो, आपल्याशी बोलतो. त्यामुळे प्रत्येकाशी आदराने वागा कारण, देव कोणत्या रुपात येईल याचा अंदाज तुम्ही बांधू शकत नाही. गणपती बाप्पा मोरया!” अशी पोस्ट श्रेयसने शेअर केली आहे.
हेही वाचा : ‘मुळशी पॅटर्न २’ केव्हा येणार? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत गश्मीर महाजनी म्हणाला…
श्रेयस तळपदेच्या पोस्टवर बापू वाघमोडे यांनी अभिनेत्याचे आभार मानत, “दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. माझा फोटो पोस्ट केल्याबदल धन्यवाद. तेव्हा मला तुमच्याशी बोलताना सुचलं नाही की आम्ही दोघे नवरा बायको तुमचे बिग फॅन आहोत, म्हणून आम्ही आमच्या मुलाचं नाव पण तुमच्या नावावरूनच ठेवलं आहे…श्रेयस बापू वाघमोडे जय हिंद!” अशी कमेंट केली आहे.