मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून श्रेयस तळपदे ओळखला जातो. आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयसने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या श्रेयस त्याचा आगामी चित्रपट ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये श्रेयसने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शाहरुख खान, अक्षय कुमार यांसारख्या बॉलीवूडच्या सुपरस्टारबरोबर श्रेयसने काम केले आहे. एका मुलाखतीत त्याने बॉलीवूड कलाकारांबरोबर काम करताना आलेला अनुभव सांगितला आहे.

श्रेयसने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, श्रेयसने शाहरुख व अक्षय कुमारबरोबर काम करताना आलेला अनुभव शेअर केला आहे. तो म्हणाला, “अक्षय कुमार एक अशी व्यक्ती आहे; जी अभिनय करताना तुमची प्रतिस्पर्धी असते. पण जेव्हा माणूस म्हणून तुम्हाला गरज पडते तेव्हा मित्र म्हणून तो तुमच्या पाठीशी उभा राहतो. इतर कलाकारांपेक्षा त्याच्यात हा गुण जास्त आहे.”

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
ram gopal verma pushpa 2 review
राम गोपाल वर्मा यांनी सांगितला ‘पुष्पा २’चा अनुभव; पोस्ट शेअर करत म्हणाले, “त्याची प्रतिमा…”
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

श्रेयस पुढे म्हणाला, “शाहरुखबद्दल बोलायचं झालं, तर शाहरुख हा खूप सुरक्षित कलाकार आहे. आम्ही जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा तो मला सांगायचाही हा पंच तू घे. माझ्या डायलॉगला दोन टाळ्या जास्त पडल्या, तर त्याला लगेच असुरक्षितता वाटत नाही. कारण- तो शाहरुख आहे. त्यामुळे तो बाकीच्यांना सतत प्रेरित करीत असतो आणि चित्रपटासाठी काय चांगलं आहे याचा विचार करीत असतो.”

हेही वाचा- “कन्नड चित्रपटात स्विमसूट घालायला सांगितला अन्…”, वर्षा उसगांवकरांनी सांगितला किस्सा; म्हणाल्या, “माझे वडील…”

काही दिवसांपूर्वीच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. मुंबईतील नामांकित रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. आता श्रेयसच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असून, त्याने कामावर कमबॅक केले आहे.

हेही वाचा- Video: साखरपुड्यातला प्रथमेश परबचा भावाबरोबरचा भन्नाट डान्स पाहिलात का? अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ गाण्यावर थिरकले

श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत मालिका, नाटक, चित्रपट यांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. मराठीबरोबरच बॉलीवूडमध्येही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओम शांती ओम, हाऊसफुल्ल २, इक्बाल यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याने मराठी टेलिव्हिजनसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता त्याची ही अनोखी गाठ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader