अभिनयक्षेत्रामध्ये असणारी घराणेशाही कित्येकदा चर्चेचा विषय ठरते. अनेक कलाकार मंडळी घराणेशाहीबाबत खुलेपणाने बोलताना दिसतात. हा वादाचा मुद्दा अजुनही संपला नाही. घराणेशाही म्हटलं की, वादाला तोंड फुटतं. कंगना रणौत तर या मुद्द्यावर बऱ्याचदा भरभरुन बोलताना दिसते. इतकंच नव्हे तर घराणेशाहीवरुन करण जोहरवरही आजवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. आता अभिनेता श्रेयस तळपदेनेही याबाबत भाष्य केलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये श्रेयस तळपदे हजेरी लावणार आहे. अवधूत गुप्तेच्या या शोचं हे तिसरं सीझन आहे. या शोच्या दुसऱ्या भागात श्रेयस उपस्थित राहिल. या भागामध्ये श्रेयस त्याच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसेल. त्याचबरोबरीने कलाक्षेत्रामधील अनेक विषयांवरही तो बोलणार आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”

आणखी वाचा – चार चित्रपट करुनही काम मिळेना, शेवटी नोकरी केली पण…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “माझा पगार…”

या कार्यक्रमाचे प्रोमोही समोर आले आहे. याच प्रोमोमध्ये अवधूत त्याच्याबरोबर एक गेम खेळताना दिसत आहे. अवधूत त्याला काही पत्र देणार आहे. त्यातील पत्र तो कोणाला देऊ इच्छितो हे श्रेयसला सांगायचं आहे. यामध्ये अवधूत एक पत्र त्याला देतो. त्यामध्ये असं वाक्य लिहिलेलं असतं की, “आता भेटलात पुन्हा भेटू नका”. श्रेयसने याचं दिलेलं उत्तर सगळ्यांच्याच भूवया उंचावणारं आहे.

आणखी वाचा – “वडिलांना हे क्षेत्र मान्य नव्हतं आणि…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “आमच्या तीन भावडांपैकी…”

“आता भेटलात पुन्हा भेटू नका” हे पत्र तुला कोणाला द्यायला आवडेल?” असं अवधूत श्रेयसला विचारतो. तेव्हा श्रेयस म्हणतो, “हे फक्त एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही. घराणेशाही करणाऱ्या सगळ्यांना मला हे पत्र द्यायचं आहे की, आता भेटलात पुन्हा नका भेटू”. श्रेयसच्या या वक्तव्यावरुन त्यालाही घराणेशाहीचा सामना करावा लागला असल्याचं दिसतं.

Story img Loader