मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी (१५ डिसेंबर) हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याला तातडीने मुंबईतल्या अंधेरीमधील वेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिरावली असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती श्रेयसची पत्नी दिप्ती तळपदेने दिली आहे. सोशल मीडियाद्वारे दिप्तीने एक पोस्ट शेअर करून अभिनेत्याच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे.

माहितीनुसार, गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदे ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटांचं चित्रिकरण संपवून जेव्हा तो घरी आला तेव्हा ही घटना घडली. घरी परतल्यानंतर ४७ वर्षीय श्रेयसला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. तेव्हा त्याने पत्नीला याबाबत सांगितलं आणि त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. पत्नी दिप्ती तळपदेने काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट करून अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

हेही वाचा – “प्रत्येकाला खूश ठेवणं…”, बोल्ड फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री अक्षया नाईकचं चोख उत्तर, म्हणाली…

श्रेयसची पत्नी काय म्हणाली?

प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि माध्यमं,

माझ्या पतीच्या आरोग्याबाबत काळजी व्यक्त करून प्रार्थना केल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतेय. आता त्याची प्रकृती स्थिरावली असून लवकरच त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे, आणि हे सांगताना मला समाधान वाटत आहे.

या काळात तातडीने मेडिकल टीमने योग्य उपचार केल्यामुळे त्यांचे आणि रुग्णालयाचे मी आभार मानते. तसेच एक विनंती करते की, आमच्या प्रायव्हसीचा तुम्ही आदर करावा. कारण श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद आमच्या दोघांसाठी या काळात मोठी ताकद आहे….दिप्ती श्रेयस तळपदे

दरम्यान, श्रेयसच्या पत्नीच्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळीसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “काळजी घे गं आणि श्रेयस लवकरच बरा होईल. बाप्पा त्याची काळजी घेईल,” अशी प्रतिक्रिया रेशम टिपणीसने दिली आहे. तर ऋतुजा देशमुख, सुकन्या मोने, नेहा राजपाल, काजल काते अशा अनेक कलाकारांनी श्रेयस लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.

Story img Loader