Shriya Pilgaonkar Navra Maaza Navsaacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा’ या एव्हरग्रीन चित्रपटाचा दुसरा भाग २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या काही दिवसांपासून या दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ‘नवरा माझा नवसाचा २’ला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. मात्र, या तुम्हाला माहितीये का सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांची लाडकी लेक श्रियाने यात खास कॅमिओ केला आहे.

श्रियाने ( Shriya Pilgaonkar ) ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये लहानशी भूमिका साकारली आहे. याबद्दल पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने माहिती दिली आहे. चित्रपटाची घोषणा केल्यापासून सचिन पिळगांवकरांना यामध्ये श्रिया झळकणार का? यासंदर्भातील अनेक प्रश्न विचारले जात होते. याचा उलगडा सिनेमागृहांमध्ये झाला आहे. श्रियाने या एव्हरग्रीन चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. श्रियाच्या कॅमिओच्या एन्ट्रीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे यासंदर्भात स्वत: पोस्ट शेअर करत श्रियाने माहिती दिली आहे.

हेही वाचा : Video: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निलेश साबळेची एन्ट्री, खुमासदारपणे विचारलेले तिखट प्रश्न ऐकून सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग

नवरा माझा नवसाचा २ : श्रिया पिळगांवकरची खास पोस्ट

श्रिया ( Shriya Pilgaonkar ) लिहिते, “सरप्राइज… ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातील ही माझी खास भूमिका… चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तुम्हा सर्वांच्या असंख्य प्रतिक्रिया आणि तुम्ही शेअर केलेले व्हिडीओ पाहून मला खरंच खूप छान वाटलं. या दिग्गज कलाकारांबरोबर मी या आयकॉनिक सीक्वेलचा भाग नसणं हे केवळ अशक्य आहे. बाप्पाचं हे गाणं मला खूपच आवडलं कारण, यात नऊवारी साडी नेसून मी माझ्या सुंदर आईबरोबर डान्स केला आहे. याशिवाय पप्पांनी दिग्दर्शन करणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास होती. चित्रपटाला जे यश मिळतंय त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. तुम्ही चित्रपटाला जे प्रेम देताय त्याबद्दल धन्यवाद…गणपती बाप्पा मोरया! ‘नवरा माझा नवसाचा २’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पाहा”

हेही वाचा : बिग बॉसने घराबाहेर काढल्यावर चॅनलने संपर्क केला का? आर्या जाधवने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली…

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास २ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जोशी, निर्मिती सावंत, वैभव मांगले, हरिश दुधाडे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सगळ्या टीमला श्रियाने ( Shriya Pilgaonkar ) भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.