आजी-आजोबा अन् नातवंडांमध्ये नेहमीच खास बॉण्डिंग असतं. अभिनेत्री श्रिया पिळगांवकर आणि तिच्या आजोबांचं देखील सुंदर असं नातं आहे. आज आपल्या आजोबांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त श्रियाने खास पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सीरीज अशा विविध माध्यमांतून काम करून स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगांवकर. आतापर्यंत ती विविध कलाकृतींमध्ये झळकली. मराठीपेक्षा जास्त काम तिने हिंदी मनोरंजन सृष्टीत केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन व अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची श्रिया एकुलती एक मुलगी आहे.

Shocking video of man attacked elder woman and snatched chain robbery video viral on social media
बापरे, आता वृद्ध महिलाही सुरक्षित नाहीत! घराबाहेर उभ्या असणाऱ्या महिलेबरोबर ‘त्याने’ काय केलं पाहा, धक्कादायक VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
Old man plays drums at wedding emotional video viral on social Media
VIDEO: “गरिबी आणि जबाबदारी वय बघत नसते” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
shocking video
VIDEO : चूक कोणाची? रस्त्याच्या मधोमध चालत होत्या आजीबाई, भरधाव वेगाने धावणाऱ्या बसने.. व्हिडीओ होतोय व्हायरल
an old man in 90s do exercise
VIDEO : नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम! तरुणांनो, मग तुम्ही का कारणं देता? Video Viral
first generation of immigrants is mirror of social changes taking place in India
समृद्ध अडगळीचे ओझे…

हेही वाचा : रवी जाधव यांचा लेक परदेशात झाला पदवीधर! कॅनडामध्ये पूर्ण केलं शिक्षण, दिग्दर्शकाचा आनंद गगनात मावेना

लाडक्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत श्रिया लिहिते, “माझे आजोबा ८५ वर्षांचे झाले. त्यांची एनर्जी अफाट आहे. त्यांची नातं असणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि त्यांच्याबरोबर हे जीवन अनुभवणं हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. आमच्या बरोबर घडलेल्या सगळ्या प्रेरणादायी गोष्टींना मी कायम माझ्या हृदयाजवळ ठेवेन. आजोबांना आयुष्यातील आणखी काही साहसी वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा! वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आजोबा.”

“मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना… लव्ह यू सो मच आजोबा” अशी पोस्ट श्रियाने आपल्या आजोबांसाठी शेअर केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचे संपूर्ण कुटुंबीय आजोबांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी तिचे आई-वडील देखील उपस्थित होते.

हेही वाचा : श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’मध्ये कॅमिओ करणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री; याआधी ‘बाहुबली’ प्रभाससह केलंय काम

श्रियाच्या आजोबांचे वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत जगभरातील १०० देश फिरून झाले होते. “माझे ८४ वर्षांचे आजोबा अरुण सबनीस सध्या मलेशियात असून त्यांचे आतापर्यंत १०० देश फिरून झाले आहेत” असं अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. या ट्रिपमध्ये श्रिया व तिच्या आईने आजोबांना एक छानसं सरप्राइज दिलं होतं. यावरून अभिनेत्रीचं तिच्या आजोबांवर किती प्रेम आहे हे लक्षात येतं.

दरम्यान, श्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिने तिचे वडील अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. आता लवकरच ती ‘ताजा खबर’ वेबसीरिजच्या पुढच्या भागात झळकणार आहे.

Story img Loader