Chhaava Movie : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सध्या खूपच चर्चेत आला आहे. कारण आहे ‘छावा’ चित्रपट. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज (१९ ऑगस्ट) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटात बरेच मराठी कलाकार झळकणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा. ( Shubhankar Bkbote )
मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं अदबीनं घेतलं जातं. २०१६ साली पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी सिनेसृष्टी हादरली होती. पण अश्विनी एकबोटे यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. अश्विनी एकबोटेंचा मुलगा शुभंकरने ( Shubhankar Bkbote ) आईच्या पावलावर पाऊल ठेवून मराठी सिनेसृष्टीत काम करत आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने विविधांगी भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हेही वाचा – ‘कलर्स मराठी’ची ‘ही’ लोकप्रिय मालिका गाशा गुंडाळणार, दोन महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या आली होती भेटीस
आता शुभंकर ( Shubhankar Bkbote ) विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात शुभंकर व्यतिरिक्त अभिनेता संतोष जुवेकर, आशिष पाथोडे हे मराठी कलाकार झळकणार आहेत. पण हे मराठी कोणत्या भूमिकेत असणार आहेत? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शुभंकर एकबोटेने ( Shubhankar Bkbote ) ‘छावा’ चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे, “६ डिसेंबरपासून सर्वत्र एकच डरकाळी एकच गर्जना. जय भवानी, हर हर महादेव, छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय.” ‘छावा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच शुभंकरच्या पत्नीसह मित्रमंडळींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीबरोबर साजरे केले रक्षाबंधन, फोटो शेअर करत म्हणाला…
‘छावा’ चित्रपटाची ‘पुष्पा २’शी होणार टक्कर
दरम्यान, ‘छावा’ चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार ‘छावा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाशी टक्कर होणार आहे. ‘छावा’ चित्रपटात विकी व रश्मिका व्यतिरिक्त अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.