Marathi Actor Shubhankar Ekbote Meets Aamir Khan : आयुष्यात एकदा तरी आपल्या आवडत्या सुपरस्टारला भेटायचं हे प्रत्येक तरुण कलाकाराचं स्वप्न असतं. अशाच एका मराठी अभिनेत्याचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. ज्याचे सिनेमे पाहून बालपण गेलं. ज्याचा अभिनय पाहून विविध छटा उलगडल्या गेल्या अशा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने अभिनेता शुभंकर एकबोटे भारावून गेला आहे.

शुभंकर एकबोटे सध्या ‘Runaway Brides’ या नाटकात काम करत आहे. हे नाटक पाहण्यासाठी आमिरने उपस्थिती लावली होती. यावेळी नाटकात भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं आमिरने बारकाईने लक्ष देऊन कौतुक केल्याचं शुभंकरने सांगितलं आहे. आमिरबद्दल भलीमोठी पोस्ट शेअर करत शुभंकरने या ग्रेट भेटीचा अनुभव सांगितला आहे.

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Akshaya Hindalkar
दीड वर्ष चालता येत नव्हतं, हातातली मालिका गेली अन्…; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्रीचा झालेला अपघात, म्हणाली…
Umesh Kamat
Video: उमेश कामतने घेतली ‘ही’ बाईक; पत्नी प्रिया बापटसह केली पूजा, व्हिडीओ शेअर करत दाखविली पहिली झलक
Govinda Family
गोविंदामुळे मुलगी टीनाला बॉलीवूडमध्ये मिळाले नाही काम; सुनिता आहुजा म्हणाली, “घर चालवण्यासाठी तिला…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम

शुभंकर एकबोटेची पोस्ट

काबिल बनो काबिल…कामयाबी झक मारके पीछे आएगी
No Words To Express My Happiness & Gratitude For These Moments!
माझा जन्म १९९४ चा आणि मला माझ्या आई-बाबांनी अगदी लहानपणापासून मोठ्या पडद्यावर Theatre मध्ये जाऊन बरेच हिंदी-मराठी चित्रपट दाखवले. कदाचित आज मी या क्षेत्रात असण्यामागे काही महत्त्वाच्या कारणांपैकी तेच एक कारण असावं. लहानपणीच्या काही आठवणी एकदम Strong Images बनून आपल्या मनात कायम घर करून राहतात. 75mm च्या मोठ्या पडद्यावर अगदी पहिला चित्रपट जो मला दाखवला गेला तो होता ‘रंगीला’.

‘रंगीला’मधला ‘मुन्ना’ ते ‘लालसिंग चड्ढा’मधला ‘लालसिंग’ हा संपूर्ण प्रवास बघत मी लहानाचा मोठा झालो. या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर Mr. Perfectionist ने त्याच्या प्रत्येक भूमिकेतल्या रंगीबेरंगी छटांनी माझ्या मनाला भुरळ घातली. मला त्याच्या कामाच्या प्रेमात पडायला लावलं. खरं सांगतो, जेव्हा त्यांना मी त्यांच्या Seat वर जाऊन बसताना बघितलं तेव्हा काही क्षण काहीच सुधरलंच नाही. मनात एकाच वेळी त्याने साकारलेली प्रत्येक Iconic भूमिका दिसायला लागली आणि त्यांची खास गाजलेली वाक्य घुमायला लागली! स्वतःला एकवटून सांगितलं की, आपल्याला फक्त आपलं काम मनापासून जीव ओतून करत राहायचं आहे समोर कोणीही असो… कदाचित हेच त्याने स्वतःला सांगितलं म्हणून आज तो Mr.Perfectionist आहे !

ज्या माणसाला आजपर्यंत आपण मोठ्या पडद्यावर बघितलं तो स्वतः प्रेक्षकांमध्ये बसून शांतपणे माझं काम बघतोय, आमचं नाटक Enjoy करतोय आणि नाटक संपल्यावर आमच्या संपूर्ण Team चं कौतुक करतोय, प्रत्येकाला जातीने आवर्जून त्याच्या/तिच्या कामाची दाद देतोय हे बघून इतकंच जाणवलं की यशाने कितीही मोठी उंची गाठली तरी तुमची मुळं जर मजबूत असतील तर प्रत्येक जण Perfectionist होऊ शकतो.

प्रेक्षकांनो! तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार! २०२५ ची सुरुवात हाऊसफुल्ल शोने झालेली आहे. याचं क्रेडिट आमच्या ‘Runaway Brides’ या संपूर्ण टीमचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवून इतकी मोठी संधी दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे मनापासून आभार.

हेही वाचा : हातात हिरवा चुडा, मेहंदी अन्…; ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरची लक्षवेधी पोस्ट; म्हणाली, “लवकरच…”

दरम्यान, शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा लेक आहे. शुभंकरने आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कन्यादान’मुळे तो घराघरांत पोहोचला.

Story img Loader