RCB vs GT : आयपीलएल २०२३मध्ये रविवारी(२१ मे) गुजरात टायटन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पार पडलेला सामना रोमहर्षक ठरला. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने १९८ धावांचं लक्ष गुजरात टायटन्ससमोर ठेवलं होतं. शुबमन गिलने उत्कृष्ट खेळी करत आरसीबी विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला.
शुबमनने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकलं. त्याने ५२ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या जोरावर १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. विजयाचा षटकार मारत शुबमनने शतक पूर्ण करत गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर शुबमनने त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर केली होती.
हेही वाचा>> Video : अभिनयातून ब्रेक घेत शेतीच्या कामात रमला आकाश ठोसर, ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल
गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीच्या सामन्यातील काही फोटो शुबमनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. “आता सुरुवात झाली आहे,” असं कॅप्शन शुबमनने या फोटोला दिलं आहे. त्याच्या या फोटोवर प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रथमेश परबने कमेंट केली आहे. “भविष्य” अशी कमेंट करत प्रथमेशने इमोजी पोस्ट केले आहेत.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्याने आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स विजयी ठरल्याने मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे.