मराठी चित्रपटात आता इतर भाषेतील चित्रपटांसारखे वेगवेगळ्या धाटणीचे विषय मांडले जात आहेत. ‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ यांसारखे प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर आधारित ‘श्यामची आई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच याचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या पोस्टरवर खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी त्याची आई दिसत आहे. या चित्रपटाचे पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आहे. हा चित्रपट साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
आणखी वाचा : “मराठी कलाकार एका टेकमध्ये…”, शशांक केतकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाला “शूटींगच्या ठिकाणी…”
‘श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्याबरोबरच गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, सारंग साठ्ये, मयूर मोरे, उर्मिला जगताप, भूषण विकास, सुनिल अभ्यंकर, अक्षया गुरव अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आहे. ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. तर सुपरहिट ‘पावनखिंड’ चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब अजय -अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.
यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु आहे. ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.