साने गुरुजी यांनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकातील अनेक कथा आपण अभ्यासक्रमात वाचल्या. आता याच आई आणि मुलाच्या दृढ नात्याची तसेच निस्सीम प्रेमाची गोष्ट मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर आधारित ‘श्यामची आई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
या ट्रेलरमध्ये सानेगुरुजी आणि इंग्रज यांच्यातील चकमक, सानेगुरुजींची अटक, त्यांचे हाल आणि अखेर त्यांनी लिहायला घेतलेलं एक पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’ यावर आधारित आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्या मुलाला पोहता यावं तो भित्रा बनू नये यासाठी त्याला विहिरीत ढकलणारी आई, तर अभ्यास केला नाही म्हणून त्याला ओरडणारी, दुसऱ्याचं पुस्तक आणून त्यातून अभ्यास करायला सांगणारी, फुलांच्या कळ्या तोडून आणल्या म्हणून त्याला ओरडणारी आई यात पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘श्यामची आई’ चित्रपट ‘या’ महिन्यात होणार प्रदर्शित, पहिलं पोस्टर समोर
या चित्रपटात स्वातंत्र्य लढ्याचा काळही दाखवण्यात येणार आहे. त्याची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘श्यामची आई’ हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री गौरी देशपांडे श्यामच्या आई ही भूमिका साकारत आहे. तर अभिनेता ओम भुतकर हा साने गुरुजींच्या म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांच्या भूमिकेत दिसत आहे. येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘श्यामची आई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ यांसारखे प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके करत आहे. या चित्रपटात बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, सारंग साठ्ये, मयूर मोरे, उर्मिला जगताप, भूषण विकास, सुनिल अभ्यंकर, अक्षया गुरव अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.
‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. तर सुपरहिट ‘पावनखिंड’ चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब अजय -अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.तर या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.