पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर आधारित एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांना आई आणि मुलाच्या दृढ नात्याची गोष्ट ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या रुपाने अनुभवता येईल. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “माझ्या या या अटी आहेत, तरच मी येईन, नाहीतर…”, मराठी कलाकारांच्या मागण्या पाहून प्रसिद्ध आयोजक संतापला

‘श्यामची आई’ हा चित्रपट संपूर्णत: ब्लॅक अँड व्हाइट स्वरुपात दाखवण्यात येणार असल्याचं या चित्रपटाच्या ट्रेलरवरून लक्षात येत आहे. अभिनेत्री गौरी देशपांडे मायाळू, खंबीर आणि वेळप्रसंगी कणखर अशा श्यामच्या आईची भूमिका चित्रपटात साकारणार आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला आपल्याला मुलाला पोहता आलं पाहिजे, त्याला भित्रा म्हणून कोणीही हिणवू नये याची काळजी म्हणून मुलाला विहिरीत ढकलणारी आई आपल्याला दिसते. मायाळू पण, श्यामला कडक शिस्तीत वाढवणारी, त्याला अभ्यासाचं महत्त्व पटवून देणारी आई ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेते.

हेही वाचा : “ही प्रथा कुठून सुरू झाली?”, नवरात्र उत्सवासंदर्भात वैभव मांगलेंची संतप्त पोस्ट, म्हणाले…

बालपणीचा काळ संपल्यावर पुढे साने गुरुजी स्वातंत्र्य लढ्यात कसे सहभागी होतात? गावात आलेली प्लेगची साथ, सानेगुरूजी आणि इंग्रजांमधील मतभेद, तुरुंगवास आणि अखेर श्यामची आई या पुस्काचं लेखन असा साने गुरूजींचा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

हेही वाचा : तब्बल २० वर्षांनी येणार ‘खाकी’चा सीक्वल; अमिताभ बच्चन व तुषार कपूरसह दुसऱ्या भागात कोण झळकणार? जाणून घ्या

‘श्यामची आई’ चित्रपटाच्या ट्रेलरचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ‘शाळा’, ‘फुंतरु’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे दर्जेदार चित्रपट बनवणाऱ्या सुजय डहाके यांची ही कलाकृती आहे. ‘श्यामची आई’ चित्रपटात ओम भूतकर, गौरी देशपांडे, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, अक्षया गुरव, उर्मिला जगताप असे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. पुढच्या महिन्यात १० नोव्हेंबरला या चित्रपट प्रदर्शित होणार आहे.