सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत चांगलीच लोकप्रिय आहे. दोघेही सध्या स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. सिद्धार्थ-मितालीने आपल्या स्पेन ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यावर त्यांनी स्पेनमध्ये स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला. स्काय डायव्हिंगचे व्हिडीओ दोघांनीही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हेही वाचा : “आंसू उसके और आंखें मेरी हो…” कार्तिक-कियाराच्या बहुचर्चित ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
सिद्धार्थ-मितालीने शेअर केलेले स्पेनमधील फोटो तसेच व्हिडीओंवर त्यांच्या चाहत्यांसह मराठी चित्रपटसृष्टीतील मित्रमंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत. सध्या सिद्धार्थच्या स्काय डाव्हिंगच्या व्हिडीओवर आलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सिद्धार्थने स्काय डायव्हिंगचा व्हिडीओ शेअर करून त्यावर कॅप्शन देत म्हटले आहे की, “माझ्या आयुष्यातील हा सर्वात भीतिदायक, पण त्याच वेळी मनाला शांती देणारा अनुभव होता. १५ हजार फुटांवर आलेला हा अनुभव मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच विसरणार नाही. स्पेनच्या स्काय डायव्हिंग आयोजकांचे खूप खूप आभार… मी नक्कीच पुन्हा हा अनुभव घेण्यासाठी येईन…”
हेही वाचा : “‘जवान’मध्ये काम करणे…” सान्या मल्होत्राने सांगितला अनुभव, म्हणाली “शाहरुखबरोबर…”
सिद्धार्थचा हा व्हिडीओ पाहून एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “तू जिथे स्काय डायव्हिंग केले तेथील व्ह्यू (उंचावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर) अजिबात चांगला नव्हता, त्यापेक्षा दुबईमध्ये स्काय डायव्हिंग केले असतेस, तर सुंदर व्ह्यू पाहता आला असता.” यावर भन्नाट उत्तर देत सिद्धार्थ म्हणाला, “सॉरी भाई, माझे बजेट कमी होते.” सिद्धार्थने दिलेले हे उत्तर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, सिद्धार्थ चांदेकर लवकरच ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.