सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. हे दोघंही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सिद्धार्थ – मितालीच्या सगळ्याच पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर हे दोघंही दरवर्षी आवर्जुन परदेश दौऱ्यावर जातात.

गेल्यावर्षी सिद्धार्थ-मिताली स्पेन दौऱ्यावर गेले होते. तेथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यावर त्यांनी स्पेनमध्ये स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला होता. आता यावर्षी हे मराठमोळं जोडपं इटली, स्वित्झर्लंड फिरायला गेलं आहे. सिद्धार्थ-मितालीने यंदा स्वित्झर्लंडमध्ये पुन्हा एकदा स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला आहे. याचा खास व्हिडीओ मितालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला होता.

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : Video : मेस्सीची जर्सी, दोन वेण्या अन् सोनाली कुलकर्णीचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “विकी कौशल तू…”

सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी एका फोटोला “वार्षिक सहल…” असं कॅप्शन देत त्यांच्या चाहत्यांना परदेश दौऱ्यावर जात असल्याचं सांगितलं होतं. यानंतर यावर्षी सिद्धार्थ – मिताली यावर्षी नेमके कुठे फिरायला जाणार याबद्दल चर्चा रंगली होती. अखेर परदेशातून सुंदर असे फोटो शेअर करत सिद्धार्थने इटली, स्वित्झर्लंड फिरायला आल्याचं सांगितलं.

सिद्धार्थ – मिताली परदेशातील सुंदर ठिकाणांना भेट देत असतात. गेल्यावर्षी ही जोडी स्पेन, पॅरिस फिरायला गेली होती. तर, यावर्षी सिद्धार्थ-मिताली इटली, स्वित्झर्लंडमध्ये धमाल करत आहेत. यावेळी या जोडप्याने स्वित्झर्लंडमध्ये स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला. सध्या या जोडप्याच्या परदेशातील फोटोंवर व या स्काय डायव्हिंगच्या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : “हा आमिर खानचा मुलगा आहे?” रिक्षामध्ये आलेल्या जुनैद खानला त्याच्याच सिनेमाच्या स्क्रीनिंगला अडवलं, दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

siddharth mitali
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर ( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम )

हेही वाचा : “मैं प्यार से डिअर डार्लिंग…”, कार्टुनमधील आक्षेपार्ह संवाद ऐकून सुयश टिळक संतापला; म्हणाला, “३-४ वर्षांची मुलगी…”

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी स्वित्झर्लंडमध्ये केलं स्काय डायव्हिंग ( व्हिडीओ सौजन्य : इन्स्टाग्राम )

दरम्यान, या जोडप्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. छोट्या पडद्यावरील ‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकांमुळे मिताली घराघरांत पोहोचली. तर, सिद्धार्थ गेल्या काही महिन्यांपासून ‘झिम्मा २’, ‘ओले आले’, ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटांमध्ये झळकला आहे. आता लवकरच अभिनेत्याला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader