सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. हे दोघंही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सिद्धार्थ – मितालीच्या सगळ्याच पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर हे दोघंही दरवर्षी आवर्जुन परदेश दौऱ्यावर जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्यावर्षी सिद्धार्थ-मिताली स्पेन दौऱ्यावर गेले होते. तेथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यावर त्यांनी स्पेनमध्ये स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला होता. आता यावर्षी हे मराठमोळं जोडपं इटली, स्वित्झर्लंड फिरायला गेलं आहे. सिद्धार्थ-मितालीने यंदा स्वित्झर्लंडमध्ये पुन्हा एकदा स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला आहे. याचा खास व्हिडीओ मितालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला होता.
सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी एका फोटोला “वार्षिक सहल…” असं कॅप्शन देत त्यांच्या चाहत्यांना परदेश दौऱ्यावर जात असल्याचं सांगितलं होतं. यानंतर यावर्षी सिद्धार्थ – मिताली यावर्षी नेमके कुठे फिरायला जाणार याबद्दल चर्चा रंगली होती. अखेर परदेशातून सुंदर असे फोटो शेअर करत सिद्धार्थने इटली, स्वित्झर्लंड फिरायला आल्याचं सांगितलं.
सिद्धार्थ – मिताली परदेशातील सुंदर ठिकाणांना भेट देत असतात. गेल्यावर्षी ही जोडी स्पेन, पॅरिस फिरायला गेली होती. तर, यावर्षी सिद्धार्थ-मिताली इटली, स्वित्झर्लंडमध्ये धमाल करत आहेत. यावेळी या जोडप्याने स्वित्झर्लंडमध्ये स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला. सध्या या जोडप्याच्या परदेशातील फोटोंवर व या स्काय डायव्हिंगच्या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, या जोडप्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. छोट्या पडद्यावरील ‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकांमुळे मिताली घराघरांत पोहोचली. तर, सिद्धार्थ गेल्या काही महिन्यांपासून ‘झिम्मा २’, ‘ओले आले’, ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटांमध्ये झळकला आहे. आता लवकरच अभिनेत्याला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.