अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. एकमेकांना काही वर्ष डेट केल्यावर सिद्धार्थ-मितालीने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर सक्रिय राहून तर त्यांच्या कामाबद्दलच्या आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चाहत्यांशी नेहमीच शेअर करत असतात. तर आता सिद्धार्थ आणि मिताली यांनी पोस्ट केलेला त्यांच्या ट्रिपचा व्हिडीओ खूप चर्चा झाला आहे.
सिद्धार्थ आणि मिताली त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या परदेशातल्या ट्रिप्समुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. ते त्यांच्या चाहत्यांना घरबसल्या विविध देश फिरण्याचा अनुभव त्यांच्या पोस्टमधून देतात. नुकतेच हे दोघं दुबईला गेले होते. तर आता एक व्हिडीओ शेअर करून बुर्ज खलिफातील सगळ्यात वरच्या मजल्यावरून दुबई कशी दिसते याची झलक त्यांनी चाहत्यांना दाखवली आहे.
सिद्धार्थ-मिताली यांनी आज सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये ते बुर्ज खलिफा आतून बघताना दिसत आहेत. तर यामध्ये त्यांनी बुर्ज खलिफा च्या १५४ व्या मजल्यावरून खालचा नजारा कसा दिसतो हे दाखवलं. बघणाऱ्याला खिळवून ठेवणारा असा हा व्ह्यू आहे. याबरोबरच त्यांनी बुर्ज खलिफामध्ये जेवणाचाही आस्वाद घेतला.
हेही वाचा : “दिसणं, रोमान्स…”, सिद्धार्थ जाधवने उघड केलं त्याच्या क्रशचं नाव, जाणून घ्या कोण आहे ती?
तर आता त्यांचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून त्यांचा हा व्हिडिओ आवडल्याचं नेटकरी कमेंट करत सांगत आहेत.