मराठी मनोरंजनसृष्टीतील क्युट कपलपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर, हे दोघं नेहमी चर्चेचा विषय असतात. काही महिन्यांपूर्वी दोघं युरोप ट्रीपला गेले होते. त्यासंबंधीचे सिद्धार्थ-मितालीचे फोटो व व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर दोघांचा किस करतानाचा फोटो अधिकच चर्चेत आला होता. त्यानंतर आता मितालीच्या एका पोस्टमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. तिला ‘तू गर्भवती आहेस का?’ असं विचारलं जात आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत असून त्यावर तिनं काळ्या रंगाची हिल घातली आहे. तसेच केसांच्या कर्ली हेअरस्टाईलमुळे मिताली खूप सुंदर दिसत आहे. एका बेंचवर बसलेला तिचा हा फोटो आहे. तिनं हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मॉमीज गेटिंग हॉट’. मितालीच्या याच कॅप्शनमुळे ती गर्भवती असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची १०० कोटींकडे घोडदौड; ३० दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
मितालीच्या या पोस्टवर कमेंट करताना एकानं “आई!!” असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या चाहतीनं लिहिलं आहे की, “तू गर्भवती आहेस? हे खरं आहे का? व्वा.” तर काही चाहत्यांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
हेही वाचा – आदित्य रॉय कपूरला विमानतळावर लक्षात आलं पॅन्टचं बटण खुलं राहिलंय अन्…; व्हिडीओ झाला व्हायरल
हेही वाचा – ‘लोकमान्य’ मालिकेच्या सेटवर ‘शोले’ चित्रपटाचे झालेले शूटिंग; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ सीन
दरम्यान, सिद्धार्थ-मितालीनं आई-बाबा होणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिली नाहीये. पण, आता या चर्चांना उधाण आल्यामुळे येत्या काळात हे नक्की खरं आहे की खोटं हे स्पष्ट होईल.