सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच या लोकप्रिय जोडीने स्पेन, फ्रान्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला. दोघांनीही या ट्रिपचे अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून, आता मितालीने सिद्धार्थचा एक खास व्हिडीओ पोस्ट करीत त्याच्या स्वप्नपूर्तीची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

हेही वाचा : विकी कौशलने उडवली साराची खिल्ली, अभिनेत्रीची शायरी ऐकून म्हणाला, “मला इथून पुढे…”

सिद्धार्थ आणि मिताली अनेकदा परदेश दौऱ्यावर जात असतात, परंतु या वेळी हे दोघे सिद्धार्थचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल ७२२४ किलोमीटर दूर सातासमुद्रापार गेले होते. हॅन्स झिमर (Hans Zimmer) हा सिद्धार्थ चांदेकरचा आवडता गायक असल्याने त्याच्या कॉन्सर्टला आयुष्यात एकदा तरी जाण्याची त्याची इच्छा होती. सिद्धार्थचे स्वप्न कसे पूर्ण झाले, कॉन्सर्टला जात असताना त्याच्या मनात किती विचार होते, सिद्धार्थ किती खूश होता याचा संपूर्ण व्हिडीओ मितालीने शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ने जमवला २०० कोटींचा गल्ला, अदा शर्माने शेअर केली खास पोस्ट म्हणाली, “चित्रपटासाठी बंगालहून आसामपर्यंत…”

सिद्धार्थ चांदेकरचा हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये मितालीने लिहिले आहे की, “या कॉन्सर्टची आठवण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील… कॉन्सर्टच्या जागी पोहोचेपर्यंत सिद्धार्थचा आनंद, इच्छाशक्ती, त्याची होणारी घालमेल पाहण्यासारखी होती. कॅब ड्रायव्हरला कॉन्सर्टपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने तो मध्येच वैतागला, लहान मुलासारखा वागत होता. जेव्हा आम्ही इच्छित जागी पोहोचलो तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. या सगळ्या गोष्टी पाहून मी खूप आनंदी होते.”

सिद्धार्थचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही खास ७२२४ किलोमीटर दूर गेलो होतो, असेही मितालीने म्हटले आहे. या व्हिडीओवर दोघांच्याही चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिद्धार्थनेसुद्धा या व्हिडीओवर कमेंट करीत आनंद व्यक्त केला आहे.

Story img Loader