हॉलीवूडचा प्रसिद्ध गायक Ed Sheeran हा गेल्या काही दिवसांपासून भारताच्या दौऱ्यावर आहे. १६ मार्चला Ed Sheeran आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या भव्य कॉन्सर्टचं मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या कार्यक्रमाला Ed Sheeran च्या हजारो चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये काही मराठी कलाकारांचा देखील समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री मिताली मयेकरने या कॉन्सर्टची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये Ed Sheeran आणि दिलजीत हे दोघेही लाइव्ह परफॉर्म करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी मितालीबरोबर तिचा पती व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर आदी कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा : मच्छी फ्राय, मालवणी रस्सा अन्…; लग्नानंतर तितीक्षा तावडेने नवऱ्यासाठी केला जेवणाचा खास बेत, सिद्धार्थ म्हणाला…

मुंबईतल्या या कॉन्सर्टमध्ये Ed Sheeran ने “तेरा नी मैं लव्हर” हे पंजाबी गाणं सुद्धा गायलं. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मिताली लिहिते, “आम्ही ८ तास उभं राहिलो ते खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं कारण, या भव्य कॉन्सर्टनंतर आमचे डोळे पाणावले होते.” सध्या अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Crew : तब्बू, करीनाच्या ‘क्रू’ चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री; आक्षेपार्ह शब्द हटवले, जाणून घ्या…

मुंबईत Ed Sheeran आणि दिलजीत एकत्र परफॉर्म करणार असल्याचं कोणालाही माहिती नव्हतं. दिलजीतला अचानक रंगमंचावर बोलावून Ed Sheeranने सगळ्याच चाहत्यांना सुखद धक्का दिला. दरम्यान, भारताचा दौरा करून आता पुन्हा एकदा माघारी परतला आहे.