मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर. सिद्धार्थ व मिताली यांच्या व्हॅकेशन मोडची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. कामामधून ब्रेक घेत दोघंही पॅरिसला गेले होते. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ सिद्धार्थ व मितालीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. आता या दोघांच्या पॅरिसमधील खास फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सिद्धार्थ व मिताली त्यांच्या कामामध्ये कितीही व्यग्र असले तरी एकमेकांना अधिकाधिक वेळ देताना दिसतात. आताही दोघांनी पॅरिसमध्ये भटकंती करत मनसोक्त एण्जॉय केलं. इतकंच नव्हे तर त्यांनी पॅरिसमध्ये खास कपल फोटोशूट केलं. दोघांनीही सोशल मीडियाद्वारे पॅरिसमधील हे खास फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना नेटकऱ्यांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.
आयफेल टॉवर पाहायचा, त्याच्यासमोर उभं राहून फोटो काढण्याची अनेकांची इच्छा असते. अनेक सेलिब्रिटी मंडळीही आयफेल टॉवरसमोरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात. सिद्धार्थ व मितालीलाही पॅरिसल्या गेल्यानंतर आयफेल टॉवरसमोर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मितालीने वेस्टर्न ड्रेस परिधान करत फोटोशूट केलं. तर सिद्धार्थने यावेळी ब्लेजर परिधान केलं होतं.
आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…
विशेष म्हणजे त्यांचं हे फोटोशूट अगदी रोमँटिक आहे. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोशूटने तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लिपलॉक करत सिद्धार्थ व मितालीने एक फोटो शेअर केला. या फोटोवर अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही कमेंट केल्या आहेत. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, गायत्री दातार यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या फोटोंना पसंती दर्शवली.