अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांची जोडी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. सिद्धार्थने नुकतीच त्याची आई विवाहबंधनात अडकल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. अभिनेत्याने स्वत: पुढाकार घेऊन आईच्या लग्नाला पाठिंबा दिला. त्याच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. सिद्धार्थनंतर आता मिताली मयेकरने सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर करुन लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा : “लेकीला चांगला जोडीदार…”, शुभांगी गोखले यांचं जावयाशी आहे ‘असं’ नातं; म्हणाल्या, “आम्ही दोघं सखीला त्रास…”
सिद्धार्थ आणि मिताली हे दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती ते आपल्या चाहत्यांना देत असतात. सासूबाईंच्या लग्नातील काही निवडक फोटो मितालीने शेअर केले आहेत.
हेही वाचा : “आईच्या मृत्यूला आदिल जबाबदार”, राखी सावंतच्या भावाचे गंभीर आरोप; म्हणाला, “तिचे अश्लील व्हिडीओ काढून…”
मिताली सासूबाई सीमा चांदेकर यांना शुभेच्छा देत लिहिते, “Happy Married Life सासूबाई! माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटतो तुझा की, हा एवढा मोठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठिशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.”
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळींनी सिद्धार्थ आणि त्याच्या आईवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर प्रिया बापट, अमृता खानविलकर, सायली संजीव, मिहिरा जोशी, सानिया चौधरी यांसारख्या अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.