सिद्धार्थ चांदेकर व सई ताम्हणकर मराठी मनोरंजसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. आतापर्यंत दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘क्लासमेट’ चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. आता लवकरच त्यांचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

या चित्रपटात सई श्रीदेवीची; तर सिद्धार्थ प्रसन्न ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात दोघांचा एक किसिंग सीन आहे. या सीनची सध्या खूप चर्चा होत आहे. नुकतीच सई व सिद्धार्थने लोकमत फिल्मी या यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या गमती-जमती शेअर केल्या आहेत. दरम्यान, सिद्धार्थने चित्रपटात दाखवण्यात आलेला किसिंग सीनबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
sara ali khan visited shri shailam jyotirlinga
सारा अली खानने आंध्र प्रदेशमधील ‘या’ ज्योतिर्लिंगाला दिली भेट; फोटो शेअर करत म्हणाली, “साराच्या वर्षाचा पहिला…”
Govinda and wife Sunita Ahuja live separately
गोविंदा व त्याची पत्नी राहतात वेगळे, सुनीता आहुजा पतीबद्दल म्हणाली, “त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ…”
maddcok universe new release date stree 3 munjya 2
ठरलं! ‘स्त्री २’ अन् ‘मुंज्या’चा पुढचा भाग येणार…; ‘मॅडॉक फिल्म्स’ने केली तब्बल ८ चित्रपटांची घोषणा, श्रद्धा कपूर म्हणाली…
Ileana DCruz expecting second baby
Video: लग्नाआधीच प्रेग्नेन्सीमुळे राहिली चर्चेत, ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई? ‘तो’ फोटो व्हायरल
Abdul Sattar
Abdul Sattar : एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का? अब्दुल सत्तार म्हणाले, “पुढच्या अडीच वर्षांत….”

सिद्धार्थ म्हणाला, “गेली अनेक वर्षं आम्ही एकमेकांना ओरडतो. या वर्षांमध्ये आम्ही एकमेकांची अनेक रूपं बघितली आहेत. ज्या मुलीला मी माझी लव्ह स्टोरी सांगितली, त्या मुलीबरोबर लव्ह स्टोरी करणं हे खूप अवघड होतं. सईबरोबर हातात हात घालून चालणं, तिच्या डोळ्यांत मी बघू कसा, असा प्रश्न मला पडला होता. चित्रपटात आमचा एक रोमॅंटिक किसिंग सीन आहे. हा किसिंग सीन शूट करण्याअगोदर आणि सीन शूट झाल्यानंतरही आम्ही एकमेकांशी बोललो नाही.”

हेही वाचा- “क्षितिजाला आय लव्ह यू…”, प्रथमेश परबला ‘अशी’ भेटली खऱ्या आयुष्यातील प्राजू, लव्हस्टोरी सांगत म्हणाला…

सिद्धार्थ पुढे म्हणाला. “दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही कॉफी पिण्यासाठी भेटलो तेव्हा आम्ही यावर चर्चा केली आणि ठरवलं की यावर बोलायचं नाही. काल काय झालं याबद्दल कोणीही बोलणार नाही. कारण- हा सीन शूट करणं आमच्यासाठी खूप अवघड होतं.”

हेही वाचा- …अन् क्रांती रेडकरच्या लेकीला कोसळलं रडू! अभिनेत्रीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, नेमकं काय घडलं?

‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. प्रेम, लग्न, संसार अशा विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना श्रीदेवी व प्रसन्न यांची अरेंजवाली लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. टीप्स मराठी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार तौरानी यांनी केली आहे. सई व सिद्धार्थ व्यतरिक्त या चित्रपटात संजय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader