मराठी मनोरंजसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानं मालिका, चित्रपट, वेब सीरिज करीत लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. लहाणपणी जेमतेम १०-१२ वर्षांचा असताना त्यानं पहिल्यांदा चित्रपटात काम केलं होतं. त्या चित्रपटात त्यानं सुबोध भावे यांच्या लहाणपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर अग्निहोत्री या मालिकेमधून तो लोकप्रिय झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अगदी लहाणपणापासूनच सिद्धार्थचा सांभाळ त्याच्या आईनंच केला. आई आणि बाबा दोघांचंही प्रेम त्याच्या आईनंच त्याला दिलं. सिद्धार्थ आपल्या नावापुढे त्याच्या आईचं नाव लावतो; ज्या व्यक्तीनं आपल्याला घडवलं तिचंच नाव आपल्या नावापुढे लावावं, असं सिद्धार्थला वाटतं. वडील असूनही ते संपर्कात का नाहीत याबद्दल सिद्धार्थनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा… पहिली भेट, एक वर्ष डेट अन्…, अरबाज खानने सांगितली त्याची आणि शुराची लव्हस्टोरी, म्हणाला…

नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ वडिलांबद्दल सांगताना म्हणाला, “लहाणपणापासूनच वडिलांची माया नव्हती. कारण- ते आजूबाजूलाच नव्हते. जर आपल्याला माहीत असेल की, आपले वडील या जगातच नाही आहेत, तर आपण पुढचं आयुष्य शांततेत काढू शकतो. पण मला माहीत आहे की, माझे वडील आहेत; फक्त मला माहीत नाही की, ते कुठे आहेत आणि मला अजूनही माहीत नाही की ते कुठे आहेत? ही एक फार विचित्र परिस्थिती आहे. मला लहाणपणापासून असं मधल्या मधे अडकल्यासारखं वाटायचं. नंतर मला जाणीव झाली की, माझे वडील आजूबाजूला नाहीत या विचारात मी इतका अडकलोय की, माझी जी आई आणि बहीण २४ तास माझ्या आजूबाजूला आहेत. सतत माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडे माझं लक्षच नाहीय.”

सिद्धार्थ पुढे म्हणाला, “संपूर्ण घरात सगळ्यात जास्त शिक्षण घेतलेली माझी बहीणच आहे. दिवसा शिक्षण करून ती रात्री काम करायची. माझी आई कुठल्या कुठल्या गावात नाटकाचे दौरे करायची, महिना-महिना नाटकाचे ४०-४५ प्रयोग करून घरी परत यायची आणि मग ते पैसे घरखर्चाला वापरायची. पण, लहाणपणी माझं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे नव्हतं. एखादी गोष्ट कमी आहे यावरच मी लहाणपणी लक्ष देत गेलो.”

हेही वाचा… “अनेकदा मला गुदमरल्यासारखं…”, कतरिना कैफला बॉलीवूडमध्ये काम करताना आला होता ‘असा’ अनुभव, म्हणाली…

लहाणपणापासून ते आतापर्यंत सिद्धार्थच्या वडिलांनी सिद्धार्थशी कधीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भेटण्याचाही प्रयत्न केला नाही, असंही सिद्धार्थनं नमूद केलं.

हेही वाचा… “माझ्या मुलांनी पळून जाऊन…” अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याबद्दल ट्विंकल खन्नाने केलं भाष्य

दरम्यान, सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, अनेक वर्षं एकमेकांना डेट करून, सिद्धार्थ चांदेकरनं अभिनेत्री मिताली मयेकरबरोबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थनं स्वत: पुढाकार घेऊन, २३ ऑगस्ट २०२३ रोजी त्याच्या आईचं दुसरं लग्नही लावून दिलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth chandekar open up about his father his dad never called him he left in his childhood dvr