अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी मनोरंजविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करrत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. अनेकदा मितालीला या फोटोंमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “गाठी सोडवून देणारा तो माणूस आयुष्यात राहिला नाही…” कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “फटाके प्रदूषणाचा…”

मिताली सध्या अनेक देशांमध्ये पर्यटन करताना दिसत आहे. सोशल मीडियावर मितालीने याचे फोटोही शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मितालीच्या एका फोटोवर एका युजरने “पैसे कुठून येतात? ना सिनेमा, ना मालिका” अशी कमेंट केली होती. या युजरला मितालीने जशास तसे उत्तरही दिले होते. मात्र, आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने मिताली नक्की काय काम करते आणि तिच्याकडे पैसे कुठून येतात याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- राहुल वैद्य-दिशा परमारच्या लेकीचं थाटात पार पडलं बारसं; बाळाला ‘या’ नावाने मारतात हाक, अर्थ आहे खूपच खास

सिद्धार्थ पुढे म्हणाला ”त्यासाठी तिची ती बौद्धिक क्षमता वापरते. एखाद्या कंपनीला हँडल करणं, त्यांच्याशी कसं बोलणं हे कसब तिच्याकडे आहे. एखाद्या फॉरेनच्या कंपनीने तिला एखादी जाहिरात शूट करून देण्यासाठी सांगितले की ती अशीच मोबाईलवर शूट करून देण्यापेक्षा ती योग्य पद्धतीने करून देते. त्यासाठी कॅमेरा सेटअप, हेअर मेकअप, लाइटिंग, व्हिडिओग्राफर या सगळ्यांसाठी ती स्वतःचे पैसे वापरते. माझ्यासाठी एखाद्या कंपनीची जाहिरात आली तर त्यांच्याशी डील करण्यासाठी सुद्धा मी तिलाच सांगतो कारण त्यांच्याशी कसं बोलावं हे मला कळत नाही पण ते ती उत्तम प्रकारे करते. या सर्व गोष्टी गेल्या सात आठ महिन्यात भरपूर प्रमाणात घडल्या आहेत आणि याचा मला अभिमान आहे कारण स्वतःच्या स्वतः सर्व गोष्टी तयार करणं फार अवघड असतं.”

हेही वाचा- “आईने माझे व सुशांतचे सगळे फोटो फाडले,” अंकिता लोखंडेचा खुलासा; म्हणाली, “नंतर सहा महिन्यांनी…”

मितालीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, ”मला त्यांचा बिलकुल राग येत नाही कारण हे सगळं घडतं कसं याबद्दल त्यांना काहीच माहित नसतं. कदाचित त्यांच्या जागी मी जरी असतो तरीही मला सुद्धा हेच वाटलं असतं की तू सिनेमा मालिका काही करत नाहीस मग तुझ्याकडे पैसा येतो कुठून? पण मी तिचा नवरा आहे त्यामुळे मला माहित आहे की ती काय काय करत असते. जर परदेशातले क्लाइंट असतील तर ती पहाटे चार वाजेपर्यंत त्यांच्याशी डिल करत असते कारण तिकडच्या वेळा सांभाळून त्यांच्याशी बोलावं लागतं.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth chandekar reveals how mitali mayekar earn money dpj