मुबंई सारख्या शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न गेली कित्येक वर्ष सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर या जोडप्याने पाहिलं होतं. वर्षभरापूर्वी या जोडप्याने त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं. मुंबईमध्ये स्वतःचं घर खरेदी केलं. सोशल मीडियाद्वारे सिद्धार्थ व मितालीने फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा सिद्धार्थ शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
सिद्धार्थ व मितालीला घर खरेदी करुन वर्ष पूर्ण झालं आहे. याचनिमित्त सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली. पण हे घर खरेदी करताना मनात नेमक्या काय भावना होत्या? याबाबत त्याने पोस्ट लिहिली आहे. शिवाय वर्षभरापूर्वी घर खरेदी केल्यावर शेअर केलेला फोटो त्याने पुन्हा शेअर केला आहे.
सिद्धार्थ म्हणाला, “वर्षभरापूर्वी मी मुंबईमध्ये माझं पहिलं घर रजिस्टर केलं. लोन, डाऊन पेमेंट, खर्च याची भीती वाटायची. नंतर जाणवलं भीती उडी मारायची होती. ती मारल्यावर आपोआप पोहता येतं”. सिद्धार्थच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघांनीही अगदी मेहनत करत त्यांचं हे घर खरेदी केलं आहे.
शिवाय काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने त्यांच्या नवीन घराचा व्हिडीओही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दोघांनीही त्यांच्या घराची सजावट कशाप्रकारे केली आहे हे पाहायला मिळालं. २४ जानेवारी २०२१ रोजी सिद्धार्थ व मिताली विवाहबंधनात अडकले. दोघंही त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत.