अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता. त्याच्या सहजसुंदर अभिनयाने आणि त्याच्या उत्स्फूर्ततेने त्याने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याच्या क्रिएटिव्ह पोस्टदेखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. त्याच्या या हटके शैलीतील पोस्ट नेटकऱ्यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय ठरतात. आता नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने गायक न होण्यामागचे कारण सांगितले आहे.

आणखी वाचा : “हे माझे क्रश…”; स्पृहा जोशीने पोस्ट केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

सिद्धार्थ हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. आता नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर रील पोस्ट केलं आहे. या रीलमध्ये तो एका म्युझिकवर हातात माईक म्हणून रिमोट पकडत गाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अत्यंत उत्साहाने त्याला गाणे गायचे होते, पण सिद्धार्थने गाणं सुरु करण्यासाठी ते म्युझिक थांबण्याची गरज होती. दोन तीन वेळा सिद्धार्थने या म्युझिकचा अंदाज घेत गाण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.

सिद्धार्थ गायला लागला की ते म्युझिक पुन्हा एकदा सुरु व्हायचं. शेवटपर्यंत त्याला गाण्याची संधीच मिळाली नाही आणि अखेर सिद्धार्थने वैतागून हातातला रिमोट कोणालातरी फेकून मारल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हे रील पोस्ट करताना सिद्धार्थने लिहिलं, “म्हणून मी गायक नाही होऊ शकलो…” सिद्धार्थचे हे रील काही मिनिटांतच सोशल मीडियावर हिट झाले आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारांनीही या रीलवर प्रतिक्रिया देत हे रील त्यांना आवडल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा : “घरापासून लांब गेल्यावर…”, भावुक होऊन सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरचा ‘झिम्मा’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. तर मध्यंतरी तो ‘कॉफी’ या चित्रपटातही स्पृहा जोशीबरोबर झळकला. त्यानंतर आता सिद्धार्थ पुन्हा एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो सायली संजीव हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आलं नसून, हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल असं बोललं जात आहे.

Story img Loader