अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यावर सिद्धार्थ-मितालीने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. सध्या मितालीच्या वाढदिवसानिमित्त दोघेही दुबईत फिरायला गेले आहेत. सिद्धार्थने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर बायको मितालीचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा : Video : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने आजीच्या आठवणीत बनवला खास पदार्थ; म्हणाली, “तिच्या हातचं…”
सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मिताली एका कागदावर रंगकाम करताना दिसत आहे. मितालीला चित्र रंगवताना पाहून अभिनेता म्हणतो, “काय चाललंय बाळा तुझं, इथे दुबईला येऊन तू काय करतेस?” यावर मिताली, “यातंच मला आनंद मिळतो” असं उत्तर देताना दिसते. मिताली अगदी लहान मुलांप्रमाणे चित्र रंगवत असल्याने सिद्धार्थने याला “आणि म्हणे मी मोठी झालीये!” असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : तृतीयपंथीयांच्या लग्नाला तुमची मान्यता आहे का? गौरी सावंत म्हणतात, “आमच्या आधीच्या पिढीत…”
मितालीने अलीकडेच तिचा २७ वाढदिवस दुबईत साजरा केला. लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिद्धार्थने खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने “Happy Birthday बाळा! तुझ्या गोड स्वभावामुळे मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो. लव्ह यू….” असं म्हटलं होतं.
हेही वाचा : “अक्षया मला आईसारखी ओरडते”, हार्दिक जोशीने केला बायकोबद्दल खुलासा म्हणाला, “किचनमध्ये लुडबूड…”
दरम्यान, सिद्धार्थ-मिताली दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. लवकरच सिद्धार्थ बहुचर्चित ‘झिम्मा २’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. झिम्मा चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.