सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. छोट्या पडद्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या मितालीचा आज २७ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आज मराठी कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. सिद्धार्थने सुद्धा बायकोसाठी खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सिद्धार्थने बायकोला शुभेच्छा देण्यासाठी पॅरिसमधील रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेता लिहितो, “Happy Birthday बाळा! तुझ्या गोड स्वभावामुळे मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो. माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लव्ह यू…कायम.”
सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मितालीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघेही दुबईला गेले आहेत. २०२१ मध्ये लग्न झाल्यापासून सिद्धार्थ-मिताली अनेकवेळा परदेशात फिरायला जातात. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर दुबईतील काही फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा : “जवान संसदेत दाखवणार का?” जयराम रमेश यांचा मोदी सरकारला सवाल; किंग खानच्या चित्रपटाला राजकीय रंग
दरम्यान, सिद्धार्थ चांदेकर लवकरच ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सिद्धार्थसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.