अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लवकरच ‘झिम्मा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं “मराठी पोरी…” हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेक कलाकार मंडळी आणि नेटकऱ्यांनी या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ बनवले आहे. सिद्धार्थने देखील आपल्या बायकोसह या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

हेही वाचा : ‘त्या’ एका चित्रपटामुळे तुटलेली काजोल आणि करण जोहरची २५ वर्षांची मैत्री, दोन वर्षांच्या अबोल्यानंतर ‘असं’ मिटलं भांडण

सिद्धार्थ-मितालीच्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या जोडप्याने राहत्या घरी हा डान्स व्हिडीओ शूट केल्यामुळे सिद्धार्थ-मितालीच्या घराची झलक या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना पाहायला मिळत आहे. यातील एका युजरने दोघांच्या डान्सचं कौतुक न करता त्यांच्या घरातील पंखा स्वच्छ नाहीये असं कमेंट करत सांगितलं.

“पंखा साफ करायची वेळ आलीये” अशी कमेंट करत या सोशल मीडिया युजरने सिद्धार्थ-मितालीची खिल्ली उडवली. परंतु, अभिनेत्याने या कमेंटकडे दुर्लक्ष न करता “कधी येताय?” असा खोचक प्रश्न विचारत संबंधित नेटकऱ्याला रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. सिद्धार्थच्या कमेंटवर त्याच्या चाहत्यांनी “भारी उत्तर दिलंस” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : “मराठी पोरी with मराठी बायको!”, ‘झिम्मा २’ मधील गाण्यावर सिद्धार्थ-मितालीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Siddharth Chandekar
सिद्धार्थ चांदेकर

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकर ‘झिम्मा २’ चित्रपटात कबीर हे पात्र साकारणार आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सिद्धार्थसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. झिम्माच्या दोन्ही भागांचं दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलं आहे.

Story img Loader