सिद्धार्थ चांदेकर सध्या त्याच्या आगामी ‘झिम्मा २’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील विविध फोटो-व्हिडीओ तो इन्स्टाग्रामवर शेअर करतो. अभिनेत्याने नुकत्याच शेअर केलेल्या अशाच एका फोटोवर नेटकऱ्याने नकारात्मक कमेंट केली आहे. फोटोवरची कमेंट पाहून सिद्धार्थने संबंधित नेटकऱ्याला स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…
इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना फेक फॉलोवर्स ही संकल्पना नवीन नाही. इन्स्टाचे अनेक वापरकर्ते पैसे देऊन त्यांच्या फॉलोवर्सची संख्या वाढवतात. सिद्धार्थने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्याने, “फॉलोवर्स पाहिजे असतील तर मेसेज करा” अशी कमेंट करत त्या खाली जवळपास १ हजार फॉलोवर्स किती रुपयांना मिळतील याचे दर लिहिले होते.
हेही वाचा : लग्नानंतर अमृता देशमुखचा सासरी गृहप्रवेश! जोडीने केली सत्यनारायण पूजा, सासूबाईंनी शेअर केला फोटो…
इन्स्टाग्रामवर फेक फॉलोवर्स विकणाऱ्या या नेटकऱ्याला सिद्धार्थने कमेंट सेक्शनमध्ये “तू तुलाच का नाही घेत मग थोडे फॉलोवर्स” असं जशास तसं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. अभिनेत्याच्या इतर चाहत्यांनी त्याच्या या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आहे.
सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची बायको मिताली मयेकर नेहमीच अशा नकारात्मक कमेंट्स करणाऱ्या नेटकऱ्यांना रोखठोक उत्तरं देत असतात. दरम्यान, सिद्धार्थच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या झिम्मा २ चित्रपटात तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय त्याने टेलिव्हिजनवरच्या ‘अग्निहोत्र’, ‘जिवलगा’, ‘सांग तू आहेस का’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.