आई आपल्याला ९ महिने पोटात वाढवून जन्म देते, लहानचं मोठं करते, न कळत्या वयात आपल्यावर संस्कार करते…अशा या आईची थोरवी खरंच शब्दात व्यक्त करण्यासारखी नाही. आज १२ मे रोजी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात मातृदिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आपल्या आईचे फोटो शेअर करून या खास प्रसंगी तिला शुभेच्छा देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमधून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सुरुवातीपासून प्रचंड मेहनत करून त्याने आयुष्यात एवढा मोठा टप्पा गाठला आहे. या सगळ्यात सिद्धार्थला त्याच्या आईची मोठी साथ मिळाली. एवढंच नव्हे तर या मायलेकांनी मिळून एका मालिकेत एकत्र सुद्धा काम केलेलं आहे. आज मातृदिनाच्या शुभेच्छा देत सिद्धार्थने आईबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे. याशिवाय त्याने त्याच्या आईला एक गोड सरप्राइज सुद्धा दिलं आहे.

हेही वाचा : Video : “पप्पा आपली गाडी…”, लोकप्रिय अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी; लेकीचं सरप्राईज पाहून आई-बाबा भावुक

आईबरोबरचा फोटो शेअर करत सिद्धार्थ लिहितो, “जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई…खरंतर रोजच तुझा दिवस असतो. आज म्हटलं आपला फोटो टाकावा.” याचबरोबर त्याने आईला एक गोड गिफ्ट दिलं आहे. एका नामांकित ब्रॅण्डच्या कॉफी कपवर सिद्धार्थने त्याच्या आईसाठी “आय लव्ह यू आई…हॅप्पी मदर्स डे” असं लिहून घेतलं आहे. तसंच दुसऱ्या बाजूला ‘सीमा’ असं त्यांचं नाव देखील लिहिण्यात आलं आहे. सिद्धार्थने हे दोन्ही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

हेही वाचा : कलर्सची ‘ही’ लोकप्रिय मालिका वर्षभरातच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांच्या पोस्टने वेधलं लक्ष

सिद्धार्थ चांदेकरची आईसाठी पोस्ट

हेही वाचा : ‘कर्मवीरायण’ येत्या शुक्रवारी रूपेरी पडद्यावर; अभिनेता किशोर कदम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भूमिकेत

सिद्धार्थ चांदेकरने आईला दिलं गोड सरप्राइज

दरम्यान, आयुष्यात आईने खूप मोठा पाठिंबा दिल्याने सिद्धार्थ त्याच्या संपूर्ण नावात सुद्धा आईचं नाव लावतो. “माझी आई एकटीच आहे माझ्यासाठी…आईच माझे वडील आहेत आणि तिच माझ्यासाठी आई सुद्धा आहे. कधी ती माझी बहीण, तर कधी माझी मैत्रीण असते. आता माझ्यासाठी सगळंच माझी आई आहे. मग मधलं नाव सुद्धा तिच असलं पाहिजे.” असं सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth chandekar wish his mother on the occasion on mothers day shares special post sva 00