Siddharth Chandekar & Mitali Mayekar : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरची जोडी सध्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच एक खास गोष्ट म्हणजे, सिद्धार्थ-मितालीचा ‘फसक्लास दाभाडे’ हा एकत्र पहिला चित्रपट त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसालाच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्याकडे मराठी कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर सिद्धार्थ-मितालीने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. ही रोमँटिक जोडी ऑनस्क्रीन एकत्र केव्हा झळकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नव्या वर्षात या दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी देत त्यांच्या ‘फसक्लास दाभाडे’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मितालीसाठी खास पोस्ट शेअर करत सिद्धार्थने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सिद्धार्थ चांदेकरची मितालीसाठी खास पोस्ट

बायको!
आज आपल्या Anniversary ला आपल्या दोघांचा पहिला सिनेमा प्रदर्शित होतोय. किती भारी! मी कायम तुझी अभिनय करण्याची भूक, धडपड आणि तडफड पाहत आलोय. मला कायमच तुझा अभिमान होता, पण तुझं हे काम बघून तर मला जरा जास्तच अभिमान वाटतोय. तू एक सुंदर अभिनेत्री आहेस आणि तू आईशप्पथ कडक काम केलं आहेस. तुझ्याकडे इतकं यश येवो, इतकं ऐश्वर्यं येवो की, तुला मागे वळून बघायची गरजच भासणार नाही. मी नेहमीसारखा खंबीरपणे तुझ्या मागे उभा आहे. तू लढ! बाकी तेरा आदमी देख लेगा!
Happy Anniversary!

नवरा!

दरम्यान, सिद्धार्थच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने “पप्पू – माधुरी ला लय लय पप्प्यााााा!!!” अशी खास कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय क्षिती जोग, आदर्श शिंदे यांसह सिद्धार्थ-मितालीच्या चाहत्यांनी अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth chandekar writes special post for wife mitali on the occasion of wedding anniversary sva 00