सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान अभिनीत ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काही आठवड्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर आणि काही गाणी प्रदर्शित झाली. त्यामुळे चाहते ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार प्रदर्शित झाला आहे. या धमाकेदार ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ हा चित्रपट लग्नसंस्थेवर भाष्य करणार आहे. तेही अतिशय मनोरंजक पद्धतीने. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान यांच्यासह विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, भारत गणेशपुरे यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

हेही वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ची महत्त्वाची धुरा सांभाळणारा अभिनेता सोडणार कार्यक्रम, कारण सांगत म्हणाला…

लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच. हाच गोंधळ आपल्याला ‘लग्न कल्लोळ’मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत. यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत. त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार? आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला १ मार्चला मिळणार आहे. हा एक रॉमकॉम चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह पाहावा. दरम्यान, या चित्रपटातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.

हेही वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आणि ‘साधी माणसं’ या नव्या मालिकेचं आहे खास कनेक्शन, काय ते? वाचा…

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, “कला क्षेत्राची मला मुळातच आवड असल्याने एखादी उत्तम कलाकृती प्रेक्षकांना द्यावी, हे आधीपासूनच मनात होते. त्यातूनच ‘लग्नकल्लोळ’ची निर्मिती झाली आणि या सगळ्या प्रवासात मला सर्वोत्कृष्ट अशी टीम लाभली. कलाकार, दिग्दर्शक, लेखक, संगीत, तांत्रिक बाबी या सगळ्यासाठी माझ्याबरोबर इंडस्ट्रीतील नामवंत मंडळी जोडली गेली. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. हा रॉमकॉम चित्रपट असल्याने प्रेक्षकांना निश्चितच हसवेल. याबरोबरीने यात भावनाही आहेत.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth jadhav bhushan kadu and mayuri deshmukh lagna kallol marathi movie trailer out pps